Goa Assembly Session | Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023 : सादर कृती अहवालातून सरकार ठरले ‘नापास’ : आलेमाव

अर्थसंकल्पातील 34 टक्केच कामे पूर्ण

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Budget Session 2023: राज्य सरकारने सादर केलेल्या 2022-23च्या अर्थसंकल्पातील अंमलबजावणीसाठी हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. हे यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या कृती अहवालातून स्पष्ट झाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

गत अर्थसंकल्पात सरकारला उत्तीर्णतेची असलेली किमान 35 टक्केवारीही गाठता आली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात केलेल्या एकूण घोषणांपैकी 34% संबंधित कामे किंवा कृती पूर्ण केल्या आहेत, असे 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणांवरील कृती अहवालात नमूद केले आहे.

105 घोषणा (62%) संदर्भात कामे/कृती आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या एकूण अर्थसंकल्पीय घोषणांची संख्या 170 होती.

अशा 164 घोषणा आणि आश्वासनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे, तर 6 घोषणांशी संबंधित प्रकरण एकतर रद्द करण्यात आले आहे किंवा स्थगित ठेवण्यात आले आहे, असे अहवालात नमूद असल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

SCROLL FOR NEXT