Calangute Extortion Case: कळंगुटच्या आमदारांनंतर आता पोलिसांनीही खंडणी प्रकरण केले बंद; जाणून घ्या कारण...

आमदार लोबोंनीही दिली नाही तक्रार
North Goa SP Nidhin Valsan
North Goa SP Nidhin Valsan Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Extortion Case: कळंगुट-बागा परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट्समधून खंडणी मागितल्याचे प्रकरण गेल्या काही दिवासांमध्ये चर्चेत आले होते. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीच याची वाच्यता केली होती.

पण नंतर काही दिवसांनी त्यांनीच हे प्रकरण आता मिटले आहे, असे म्हणून या प्रकरणाला पुर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला होता. आता पोलिसांनीही खंडणी प्रकरणाबाबत एकही तक्रार नोंद नसल्याचे सांगत हे प्रकरण क्लोज झाल्याचे म्हटले आहे.

North Goa SP Nidhin Valsan
Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या 290 वर

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले की, काही दिवसांपुर्वी सोशल मीडियात एक निवेदन व्हायरल झाले होते. त्यात सात जणांच्या सह्या होत्या. त्यात खंडणीची तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता व्हिएतनाममधील नंबरवरून ती तक्रार आल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यातील काही सह्यांशी साधर्म्य असल्याने दोघांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यांनी त्यांचे नाव आणि सही वापरल्याचे म्हटले होते. पण त्यांनी या पत्राशी त्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर पोलिसांनी खंडणीबाबत काही तक्रार असल्यास दाखल करावी, असे आवाहन केले होते. जेणेकरून त्याबाबत चौकशी करता येईल. पण आत्तापर्यंत कुणीही खंडणीची तक्रार दाखल केलेली नाही.

खंडणीचा मुद्दा आमदार मायकल लोबो यांनी उपस्थित केला होता. मायकल लोबो यांच्याच हॉटेलमध्ये काही जणांनी खंडणी मागितली होती, त्यामुळे लोबोंनी हा विषय उपस्थित केला होता. तथापि, काही दिवसांनी लोबो यांनी स्वतःच हे प्रकरण मिटल्याचे म्हटले होते.

North Goa SP Nidhin Valsan
Goa Land Grab case: बनावट कागदपत्रे करून पर्रा येथील जमीन हडपली; SIT कडून दोघांवर गुन्हा दाखल

वाल्सन म्हणाले की, आमदार लोबो यांनीही तक्रार दिलेली नाही. क्राईम ब्रँचनेही या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आमच्यासाठी हे प्रकरण बंद झाले आहे. आत्तापर्यंत याबाबत कुणीही तक्रार दिलेली नाही.

तथापि, जर कुणाला काही तक्रार असेल तर त्यांनी यावे. स्पेशल ब्रँच, क्राईम ब्रँच आहे. आम्ही योग्य ती कारवाई करू.

कळंगुटमधील वेश्याव्यवसायाच्या आरोपांबाबत जेव्हा आम्हाला तक्रार मिळेल किंवा माहिती मिळेल आम्ही तत्काळ गुन्हा नोंदवू. नुकताच दक्षिण गोव्यात अशी एक ह्युमन ट्रॅफिकिंगची केस पोलिसांनी नोंद केली होती, असेही वाल्सन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com