पणजी: उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयांची प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ११ एप्रिलपासून सुरू झाली असून आतापर्यंत समर्थ पोर्टलवर नऊ हजार अर्ज प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. महादेव गावस यांनी दिली.
तीसहून अधिक पदवीपूर्व कार्यक्रम समाविष्ट असणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील सुमारे ४० महाविद्यालयांनी सहभाग घेतलेला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे.
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि त्यांचे अर्ज वेळेवर सादर करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालय गोवाच्या संकेतस्थळाला आणि ‘समर्थ’ पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. महादेव गावस यांनी केले.
बीए.बीएड प्रवेश प्रक्रिया दि. २५ एप्रिलपासून सुरू झाली असून ही प्रवेश प्रक्रिया ६ मे पर्यंत समर्थ पोर्टलवर चालणार आहे. यासाठी उमेदवाराने गोवा विद्यापीठाने घेतलेल्या जीयू-आर्ट २०२५ या चाचणीत मिळालेले गुण ऑनलाईन अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. हे गुण नमूद केले नाहीत तर अर्ज प्रवेशासाठी विचारात घेतला जाणार नाही, अशी माहिती डॉ. महादेव गावस यांनी दिली.
बीए. एलएलबीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीयू क्लॅट चाचणीला बसणे अनिवार्य असून ही परीक्षा ११ मे रोजी होणार आहे. यासाठीचे प्रवेश शुल्क गोवा विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट अथवा उच्च शिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटच्या माध्यमातून भरणे आवश्यक आहे, अशी माहितीही डॉ. महादेव गावस यांनी दिली. ज्या अर्जदारांचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत, असे डॉ. गावस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.