Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: CM प्रमोद सावंत यांचा 'अधिवेशन कार्यकाळ'चा दावा आलेमाव यांनी फेटाळला; म्हणाले 'कामकाजाचे दिवस सरकार...'

Yuri Alemao: बीएसी कोणत्याही सत्राच्या एकूण कालावधीवर निर्णय घेत नाही; कामकाजाचे दिवस सरकारच ठरवते- आलेमाव

Ganeshprasad Gogate

Yuri Alemao: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 21 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आठव्या गोवा विधानसभेच्या सहाव्या अधिवेशनाचा कालावधी कामकाज सल्लागार समिती (बीएसी) ठरवेल, असे विधान केले होते. यावर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव स्पष्टीकरण देत त्यांचे विधान खोडून काढले आहे.

'बीएसी कोणत्याही सत्राच्या एकूण कालावधीवर निर्णय घेत नाही आणि विशिष्ट सत्राच्या कामकाजाचे दिवस सरकारच ठरवीते,' असे स्पष्टीकरण देत सभापतीना लिहीलेल्या पत्रातून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढला.

'कामकाज सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीवेळी सादर केलेल्या पत्रात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोवा विधानसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाज नियम 196 अंतर्गत कामकाज सल्लागार समितीची जबाबदारी कामाकाजासाठी वेळेची शिफारस करण्यापुरती मर्यादित आहे.

विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विविध कामकाजाचा कालावधी आणि वेळापत्रक सूचित करणे एवढेच समिती करते असे नमूद केले आहे.

तसेच सरकारने विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी विधानसभेच्या सदस्यांना वाजवी वेळ द्यावा. विधेयके सादर करणे, विचार करणे हे सभागृहात योग्य चर्चेने झाले पाहिजे', असे युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या तारांकीत प्रश्नांच्या यादीसाठी एकत्रीत चिठ्ठ्या काढण्याचा ह्या अधिवेशनापासून केलेल्या बदलावरही त्यांनी आक्षेप घेत पूर्वीचीच पद्धत चालू ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT