Goa land Conversion Dainik Gomantak
गोवा

Goa land Conversion: विविध तालुक्यांत 16 भूखंडांच्या विभाग बदलास अंतिम मंजुरी; उसगावात सर्वाधिक 8 भूखंडांचा समावेश

Goa Land Zoning Change: राज्य सरकारने राज्यातील विविध तालुक्यांतील १६ भूखंडांच्या विभाग बदलास अंतिम मंजुरी दिली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य सरकारने राज्यातील विविध तालुक्यांतील १६ भूखंडांच्या विभाग बदलास अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामध्ये फोंडा तालुक्यातील उसगाव येथील सर्वाधिक आठ भूखंडांचा समावेश असून, त्याशिवाय मडगाव, वेळूस (सत्तरी), वेर्णा, नाकेरी (केपे), वानेली (सासष्टी) आणि नास्नोळा (बार्देश) येथील भूखंडांचाही विभाग बदल मंजूर करण्यात आला आहे.

या सर्व भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १४,९०१ चौरस मीटर असून, बहुतांश भूखंडांचा झुडूपांखालील, नैसर्गिक आच्छादन किंवा इतर विभागातून वसाहतीसाठीच्या विभागात समावेश करण्यात आला आहे. उसगाव येथील आठ भूखंडांचे एकत्रित क्षेत्र सुमारे २,६०६ चौरस मीटर आहे.

याशिवाय मडगावमधील भूखंडाचे क्षेत्र २,४५३ चौरस मीटर, वेळूस येथील १,१७२ चौरस मीटर, वेर्णा येथील २,७६८ चौरस मीटर, नाकेरी येथील दोन भूखंडांचे अनुक्रमे १,०७० व ६०८ चौरस मीटर, वानेली येथील ४०० चौरस मीटर, तर नास्नोळा येथील दोन भूखंडांचे १,७६२ आणि १,३९५ चौरस मीटर क्षेत्र विभाग बदलासाठी मंजूर करण्यात आले आहे. काही ठिकाणी संपूर्ण भूखंडाचा, तर काही ठिकाणी भूखंडाच्या विशिष्ट भागाचा विभाग बदल करण्यात आला आहे.

ना हरकत घेणे बंधनकारक

नगर व ग्रामनियोजन विभागाने या सर्व प्रस्तावांवर सार्वजनिक हरकती व सूचना मागविल्यानंतर गोवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग बोर्डाच्या शिफारशींच्या आधारे सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.

वेर्णा, नाकेरी आणि नास्नोळा येथील काही भूखंडांवरील विकासकामांसाठी अनुक्रमे जलसंपदा विभाग, जीसीझेडएमए आणि वन विभागाची ना हरकत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच या अधिसूचनेची अंमलबजावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रलंबित असलेल्या जनहित याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Mitchell Starc World Record: रेकॉर्ड ब्रेक! मिचेल स्टार्कनं रचला इतिहास; कसोटी क्रिकेटमध्ये ठरला सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज

FC Goa vs FC Arkadag: एफसी गोवाची झुंजीनंतर हार, एफसी अर्कादाग संघाचा 3-0 दणदणीत विजय

Congo Ebola Outbreak: कांगोत इबोला व्हायरसचा हाहाकार! 20 दिवसात 1000 जणांचा मृत्यू, 4000 हून अधिक लोक मृत्यूच्या दाढेत; 10 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

SCROLL FOR NEXT