Goa Mining Dainik Gomantak
गोवा

माजी खाणपट्टाधारकांना खनिज विक्रीस परवानगी; गोवा सरकारचा डंप पॉलिसीअंतर्गत महत्वाचा निर्णय

Goa dump policy decision: माजी खाणपट्टाधारकांनी केलेल्या यापूर्वी जाहीर न साठवलेल्या खनिज साठ्यासाठी हा निर्णय उपयोगी ठरणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य सरकारने आज खनिज क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या खनिज खाणपट्टाधारकांना त्यांनी खाणपट्ट्याबाहेर साठवून ठेवलेल्या, परंतु ज्यावर भूरूपांतर शुल्क आणि स्वामित्व धन अदा केलेले आहे अशा खनिजाच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

माजी खाणपट्टाधारकांनी केलेल्या यापूर्वी जाहीर न साठवलेल्या खनिज साठ्यासाठी हा निर्णय उपयोगी ठरणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून खनिज साठ्यांबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर काही प्रमाणात तोडगा निघणार आहे.

खनिज साठ्यांच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने 'डंप पॉलिसी' अंतर्गत घेतला आहे. यामुळे साठवलेले खनिज पुन्हा औद्योगिक वापरात आणता येणार आहे. या धोरणाचा प्रामुख्याने फायदा माजी खाणपट्टाधारकांना होणार असला तरी राज्य सरकारलाही त्याचा फायदा होणार असून सरकारच्या महसुलात भर पडणार आहे.

सरकारचे महत्त्वाचे पाऊल

खनिज क्षेत्र दीर्घकाळ थांबलेले असताना सरकारकडून आलेला हा निर्णय पुनरुज्जीवनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानला जात आहे. खनिज विक्रीदरम्यान पर्यावरणीय संतुलन बिघडू नये यासाठी प्रभावी देखरेख यंत्रणा उभारण्याची गरज आहे.

रोजगाराच्या संधी वाढतील

खनिज उद्योगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, शासनाच्या या निर्णयामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि आर्थिक हालचाल पुन्हा सुरू होईल. मात्र, पारदर्शकता व पर्यावरणीय संरक्षणाच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT