Sunburn Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival 2023: सनबर्न आयोजकांविरुद्ध कारवाई होणार का ?

सनबर्न महोत्सवावेळी झालेल्या ध्वनिप्रदूषण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी आज गोवा खंडपीठासमोर येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Sunburn Festival: गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस वागातोर येथे झालेल्या तीन दिवसांच्या सनबर्न ईडीएम महोत्सवावेळी झालेल्या ध्वनिप्रदूषण उल्लंघनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारी यंत्रणांची कानउघाडणी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सनबर्न आयोजकांविरुद्ध फौजदारी कारवाईची तक्रार म्हापसा न्यायालयात दाखल केली आहे.

या ध्वनिप्रदूषणप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी आज गोवा खंडपीठासमोर येणार आहे. म्हापसा पोलिस उपअधीक्षक, हणजूण निरीक्षक व बार्देश जिल्हाधिकारी यांच्यातर्फे या ध्ननिप्रदूषणप्रकरणी कारवाईत झालेल्या निष्काळजीपणाबाबत स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केले जाणार आहे.

मंडळाने त्यांच्या प्रक्रियेनुसार बैठक लांबणीवर न टाकता लवकर घेतली होती. प्रदूषण मंडळाच्या झालेल्या या बैठकीत मंडळाने सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे अधिकार दिले होते. त्यांनी ही तक्रार म्हापसा न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सनबर्न संगीत महोत्सवावेळी ध्वनिप्रदूषण झाल्याचे ठोस पुरावे गोवा प्रदूषण मंडळाच्या हाती होते व त्याच्या आधारे ही फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता.

सनबर्न महोत्सवावेळी 55 डेसिबल्स आवाजाच्या प्रमाणापेक्षा 90 डेसिबल्सपर्यंत कर्कश आवाजात संगीत सुरू ठेवल्याने ध्वनिप्रदूषण झाल्याची तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

त्याची दखल घेऊन गोवा खंडपीठाने प्रदूषण मंडळाला धारेवर धरून आयोजकांविरुद्ध तक्रार का दाखल करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारत कानउघाडणी केली होती. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपजिल्हाधिकारी या अधिकाऱ्यांनी कोणतीच पावले न उचलल्याने गोवा खंडपीठाने या तिन्ही यंत्रणांना फैलावर घेतले होते.

गोवा खंडपीठाने धरले होते धारेवर

गोवा खंडपीठाने याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला ध्वनिप्रदूषणप्रकरणी कोणतीच कारवाई न केल्याप्रकरणी चांगलेच धारेवर धरले होते व फौजदारी कारवाई कधी करणार याबाबत विचारणा केली होती. मंडळाची बैठक लवकर घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

Goa Live News Updates: कोपार्डे - ठाणे मार्गावर बस आणि बुलेटमध्ये अपघात; बुलेट चालक गंभीर जखमी

Jijabai Karandak: गोव्याच्या महिला संघाचा सलग 3 रा पराभव! तमिळनाडूविरुद्ध हाराकिरी; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

SCROLL FOR NEXT