Mumbai High Court New Decision Dainik Gomantak
गोवा

Chimbel Public Well Dispute: चिंबल येथील धार्मिक विहिरीचं महत्त्व जपा, न्यायालयीन आदेशाकडे कानाडोळा; वाचा नेमंक प्रकरण?

Chimbel Public Well: गौळेभाट, चिंबल येथील सार्वजनिक विहिरीचे धार्मिक महत्त्व जपण्याचे निर्देश जलदगती जिल्हा न्यायालयाने दिले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: गौळेभाट, चिंबल येथील सार्वजनिक विहिरीचे धार्मिक महत्त्व जपण्याचे निर्देश जलदगती जिल्हा न्यायालयाने दिले होते. न्यायाधीश आरतीकुमार नाईक यांनी २०११ मध्ये चिंबल मंचने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला होता. दरवर्षी एप्रिल महिन्यात देवी चिंबलकरीण पालखी माशेल-फोंडा येथून चिंबल गावात येते आणि या सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी विविध महत्त्वाचे धार्मिक कार्यक्रम केले जातात.

ही मालमत्ता एका बिल्डरने खरेदी करून तेथे बांधकाम सुरू केले आहे. बिल्डरने मंजूर बांधकाम आराखड्यात सार्वजनिक विहीर न दाखवता स्थानिक पंचायतीकडून ना हरकत दाखला मिळवला होता. मात्र, वस्तुस्थिती समोर आणली तेव्हा पंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून स्थानिक स्वयंसेवी संस्था चिंबल मंचने ७ मे २०११ रोजी जिल्हा न्यायालयात (Court) याचिका दाखल केली होती.

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या मागणीला मान्यता देत जमीनमालक व बांधकाम व्यावसायिकांना या विहिरीचे रक्षण करण्याचे निर्देश दिले. या विहिरीच्या पाच मीटरच्या परिघात कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT