Chimbel Goa: 'इंदिरानगरा'तील सरकारी जमिनीवरील घरांची ना हरकत दाखला घेताच विक्री

Chimbel Goa: चिंबल पंचायतीचे एस. शिरोडकर यांच्याकडे याविषयी तक्रार केली आहे.
Chimbel Goa
Chimbel GoaDainik Gomantak

Chimbel Goa: चिंबल येथील इंदिरानगर या वसाहतीत ज्यांचे स्थालांतर करण्यात आले होते, त्यातील काही मंडळी नवे घर किंवा फ्लॅट घेण्यात रस दाखवू लागले आहेत. त्यामुळे सध्या ज्यांना राहण्यासाठी निवारा मिळाला होता, ती मंडळी घरे विकून निघून जाऊ लागली आहे. शिवाय जे लोक ती जागा खरेदी करीत आहेत, ते बिनधास्तपणे त्या जागेवर नव्याने बांधकाम करून एक-दोन मजल्याच्या इमारती उभारत असल्याचे आता पुढे आले आहे.

इंदिरानगरातील रहिवासी संतोषसिंग राजपूत यांच्या वडिलांना इंदिरानगर वसाहत वसविण्यात आली होती, तेव्हा जागा मिळाली होती. त्यांचे कुटुंब त्याठिकाणी वास्तव्यास आहे. परंतु राजपूत यांच्या शेजारचे घर खरेदी करणाऱ्या कुटुंबाने घर बांधकामाला हरकत घेतल्यामुळे मारहाण केली. त्याप्रकरणी राजपूत यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

याविषयी पत्रकारांना माहिती देताना राजपूत यांनी सांगितले की, जे लोक घरे विकून निघून जात आहेत, त्यांनी ती जागा सरकारला परत करायला हवी होती. परंतु ही जागा विकून अनेकजण फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करत आहेत.

Chimbel Goa
Goa Petrol Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, गोव्यात पेट्रोल-डिझेल किती महागले?

आपल्या घराशेजारील घर खरेदी करणाऱ्यांनी बांधकाम काढले, त्यास आपण आक्षेप घेतला होता. सामाईक भिंत सोडून काही अंतरावर बांधकाम करावे, अशी विनंती केली; परंतु ती विनंती न मानता त्या कुटुंबातील सदस्यांनी मला मारहाण केली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आपल्याकडे आहे.

चिंबल पंचायतीत तक्रार दाखल

याविषयी चिंबल पंचायतीचे एस. शिरोडकर यांच्याकडे आपण तक्रार केली असून. पंचायतीकडे या बांधकामाविषयी संबंधिताने परवानगी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय पंचायतीकडून त्याविषयी पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com