Gauladevi Jatra Quepem traffic jam Dainik Gomantak
गोवा

गौळादेवीच्‍या जत्रोत्‍सवामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी, 18 किलोमीटरच्‍या प्रवासाला तब्‍बल 6 तास; मंत्र्यांनाही आला विदारक अनुभव

Gauladevi Jatra Quepem traffic jam: श्री गौळादेवीची वार्षिक जत्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे: श्री गौळादेवीची वार्षिक जत्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. मात्र उगे-सांगे येथील खडकाळ व कच्च्या मातीच्या रस्त्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी वाहनांना तब्बल पाच ते सहा तास ताटकळत रहावे लागले. शेकडो वाहने आणि हजारो भाविक तासान्‌तास रस्त्यात अडकून पडले.

या वाहतूक कोंडीचा अनुभव समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनीही घेतला. अनेक ठिकाणी ते स्वतः वाहनातून उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.

गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून सर्व धर्मीय भाविक मोठ्या संख्येने या जत्रेला उपस्थित राहतात. गोवा राज्याच्या सीमेवरील दिग्गी-मायरे परिसरात वसलेली श्री गौळादेवी ही नवसाला पावणारी देवता म्हणून प्रसिद्ध असल्याने उगे-सांगे मार्गावरून वाहतुकीची मोठी रहदारी असते.

गोव्याच्या हद्दीतील रस्ता खडकाळ

उगे ते जुना हा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता गोव्याच्या हद्दीत येतो. पुढील भाग कर्नाटक राज्यात असला तरी तो तुलनेने चांगल्या स्थितीत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. गोव्याच्या हद्दीत मात्र रस्ता खडकाळ, अरुंद व कच्चा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

हा मार्ग नेत्रावळी अभयारण्यातून जात असल्याने डोंगराळ व अरुंद आहे. अनेक ठिकाणी दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नसल्याने अडथळे निर्माण होतात. काही ठिकाणी झाडे न तोडताही रस्ता दोन मीटरने रुंद करता येऊ शकतो, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

देवीच्‍या दर्शनासाठी वा नवस फेडण्यासाठी जाणारे अनेक भाविक दिवसभर उपाशीपोटी किंवा पाण्याविना जंगलात अडकून पडतात. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि ही गैरसोय दूर करावी.

- मनीष लांबोर, देवस्थान समितीचे मार्गदर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Shigmotsav: ढोल-ताशे, कांसाळी अन् 'निशाण'चा मान! गोव्यात कसा रंगतो शिगम्याचा उत्साह?

काणकोणातील 'दिवज' परंपरा धोक्यात, समिती अहवाल सरकारदरबारीच; कारवारहून दिवजांची आयात

'AI' आभाळाला भिडलं तरी 'गुरु'ची जागा घेणार नाही; अमेरिकेतील वैमानिकांच्या 'त्या' प्रयोगातून जगाला मिळाला मोठा धडा!

Anil Chaudhry Dance: "गोली तो चलेगी!" अंपायर अनिल चौधरींचा कडक स्वॅग; 'या' व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

बोर्डे, डिचोली येथे बुधवारी 'होमकुंड' उत्सव, तयारी पूर्ण; वडेश्वर देवाच्या प्रांगणात भरणार उत्सव, व्रतस्थ भक्तगण करणार अग्निदिव्य

SCROLL FOR NEXT