Goa Gas Cylinder Shoratge Dainik Gomantak
गोवा

VIDEO: रांगाच रांगा, गॅस सिलिंडरसाठी धावाधाव; गर्दी हातघाईवर, पोलिसांना केले पाचारण

Goa Gas Cylinder Shoratge: आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याने, धास्तावलेल्या लोकांनी घरगुती गॅससाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आखाती युद्धामुळे गॅस सिलिंडर वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याने, धास्तावलेल्या लोकांनी घरगुती गॅससाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर गर्दी केली. सर्वच गॅस एजन्सीसमोर लोकांच्या लांबलचक रांगा दिसून येत आहेत.

मडगावात गुरुवारी सर्वच गॅस एजन्सीसमोर नागरिक रांगेत उभे होते. “आमच्याकडे घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा आहे; कुणीही धास्ती घेऊ नये,” असे सांगूनही ग्राहकांचे समाधान झाले नाही. प्रत्येकाच्या मनात सिलिंडर मिळाले नाही तर काय होईल, हीच चिंता होती.

आके येथील गॅस वितरक प्रवीण नाईक यांनी सांगितले की, “आमच्याकडे घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत; लोकांनी भीती बाळगू नये.” मडगावातील प्रत्येक गॅस एजन्सीसमोर लोक सकाळपासून रांगेत उभे होते. दुपारी कडक उन्ह असतानाही ते ताटकळत उभे होते. ऑनलाईन बुकींग करूनही सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध असूनही व्यावसायिक गॅस सिलिंडर आता मिळत नसल्याचे शहरातील एजन्सीवाल्यांनी सांगितले.

हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते संकटात

त्यामुळे हॉटेल, कॅटरिंग तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रीवाल्यांसमोर संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत व्यवसाय सुरू ठेवणेही कठीण झाले असून, स्थिती अशीच राहिल्यास व्यवसाय बंद करावा लागेल, अशी माहिती बर्डे येथील हॉटेल व्यावसायिक अर्जुन नाईक यांनी दिली.

मांद्रेत गॅसच्या तुटवड्याची धास्ती

गॅस सिलिंडरचा तुटवडा लक्षात घेऊन ग्राहक सध्या धावाधाव करत आहेत. वास्तविक सिलिंडरचे वितरण घरोघरी केले जाते; मात्र काही ग्राहक तुटवडा होईल या भीतीने वितरकाकडे गर्दी करत आहेत. अनेकजण रिकामा सिलिंडर घेऊन येतात; मात्र डीसी क्रमांक असल्याविना सिलिंडर दिला जात नाही, असे मांद्रे इंडेन गॅस वितरक शेटगावकर यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, गॅस कार्डधारकांना महिन्याला एक सिलिंडर मिळेल, असे जाहीर केल्याने काहींनी धसका घेतला आहे. अनेक कुटुंबांना पंचवीस दिवस एक गॅस सिलिंडर पुरत नाही; त्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. परंतु सध्या तरी गॅसचा तुटवडा नाही. मागणीनुसार बेळगावीहून पुरवठा होतो. त्यात सर्व्हर सेवा विस्कळीत होत असल्याने ग्राहक नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

सिलिंडर मिळवण्यासाठी पेडणेत ग्राहकांच्या रांगा

एका बाजूने कमर्शियल गॅस सिलेंडरची टंचाई असल्यामुळे घरगुती सिलेंडर मिळावेत, यासाठी पेडणे गॅस कार्यालयाकडे ग्राहकांच्या रांगांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या आखाती देशांत युद्ध सुरू असल्यामुळे गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद भारतातही उमटले असून त्यामुळे ग्राहकांनी सिलेंडर मिळावेत यासाठी धडपड सुरू केली आहे. अनेकजण थेट सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीचे कार्यालय गाठत असून तेथे रांगा लावत आहेत. काही गॅस एजन्सी घरोघरी सिलेंडर पोचवतात; परंतु ही वाहनेही येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूने कमर्शियल गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही हॉटेल व रेस्टॉरंटवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. पेडणेतील काही हॉटेलांत ग्राहकांना गरम पाणी देणेही कमी करण्यात आले आहे. किनारी भागातील काही रेस्टॉरंटनी आपल्या मेनूमधील काही खाद्यपदार्थ वगळले आहेत.

शिवोलीत गर्दी हातघाईवर; पोलिसांना केले पाचारण

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी बुधवारी केलेल्या कमर्शियल गॅस तुटवड्याच्या वक्तव्यामुळे या भागातील रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्स मालकांचे धाबे दणाणलेले असतानाच, गुरुवारी सकाळी कळंगुटात घरगुती गॅस खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेवटी स्थानिक पोलिसांना पाचारण करावे लागले.

गुरुवारी सकाळपासून येथील शांतादुर्गा मंदिर परिसरात असलेल्या गॅस पुरवठा करणाऱ्या स्थापनांसमोर घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिलिंडरसाठी लोकांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रांगेत उभे राहणाऱ्या लोकांत बाचाबाचीसारखे प्रकार घडू लागले आहेत. असा प्रकार घडल्याने व गर्दी वाढल्याने स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT