Gas Cylinder Explosion Dainik Gomantak
गोवा

Gas Cylinder Explosion: चिंबल पंचायतीजवळील बंद घरात स्फोट, तब्बल 10 लाखांचे नुकसान; तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

Gas Cylinder Explosion Goa: चिंबल पंचायतीजवळ असलेल्या एका बंद घरातील साहित्याला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागून स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबल पंचायतीजवळ असलेल्या एका बंद घरातील साहित्याला बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास आग लागून स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. या आगीत संपूर्ण साहित्य खाक झाले. जुने गोवे अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन पाण्याचे बंब वापरून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अधिकारी रोहिदास डी. परब यांच्या नेतृत्वाखाली ही आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाचे अधिकारी परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचे मालक अनंत सुका वेळीप व त्यांचे कुटुंब घरी नव्हते. घराचे (House) दार बंद होते. पत्नी सकाळी कामाला निघून गेली होती तर मुले शाळेत गेली होती. सकाळी ११ वा.च्या सुमारास घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे आजुबाजूच्या लोकानी धोका ओळखून त्याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही आग भडकली होती. जुने गोवे व पणजी येथील दलाच्या दोन पाण्याचे बंब वापरण्यात आले. ही आग विझविण्यामध्ये उगम शेट गोवेकर, सुनील जल्मी, संजय सतरकर, दत्ता सिनारी व दत्ता परब यांनी यशस्वी कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT