Gas Cylinder Explosion: भाटले येथील सरकारी वसाहतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सोमवारी (ता.२७) उत्तररात्री 2 वा.च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन स्वयंपाक खोलीमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. तत्पूर्वी फ्लॅटमध्ये झोपलेल्या तिन्ही मुली झालेल्या धुरामुळे फ्लॅटबाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली. पाणी गरम करण्यासाठी हिटर सुरू ठेवला. मात्र, तो बंद करण्यास विसरल्यामुळे ही घटना घडली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणल्याने मोठा धोका टळला. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून फ्लॅटच्या भिंतींनाही भेगा पडल्याने त्यामध्ये वास्तव्य करणे धोकादायक बनले आहे.
या फ्लॅटमध्ये तुरुंगरक्षक दिलीप म्हापशेकर हे आपल्या पत्नी व तीन मुलींसह राहतात. ही घटना घडली तेव्हा फ्लॅटमध्ये तिन्ही मुलीच होत्या. त्यांचे वडील कारवारला गेले होते तर त्यांची आई पोलिस खात्यात गृहरक्षक आहे. तिला पोलिसपदी बढती मिळाल्याने ती प्रशिक्षणासाठी गोव्याबाहेर गेली आहे. त्यामुळे फ्लॅटमध्ये या तीन मुलीच वास्तव्यास होत्या.
काल रात्री एका मुलीने पाणी गरम करण्यासाठी हिटर सुरू ठेवला. मात्र, तो बंद करण्यास विसरली. हा हिटर गरम होऊन प्लास्टिकच्या बादलीने पेट घेतला. त्याच्या बाजूला असलेल्या वॉशिंग मशिनही त्याचा धग लागल्याने पेटली.
तेथेच गॅस भरलेला सिलिंडर ठेवलेला होता तोही गरम झाला होता. खोलीत धूर झाल्याने या तिन्ही मुली उठून फ्लॅटबाहेर रस्त्यावर आल्या. या घटनेची माहिती एकाल मुलीने अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दिली. दलाचे जवान व पाण्याचा बंब घटनास्थळी रात्री 2.13वा. दाखल झाले.
आगीत स्वयंपाक खोलीतील साहित्य खाक झाले होते तसेच फ्लॅटमधील इतर खोल्यांमध्येही काहीशी आगीचा धग लागल्याने नुकसान झाले.
या स्फोटामुळे भिंतीला भेगा पडल्या आहेत तर जमिनीवरील लाद्याही फुटल्या आहेत. अग्निशमन दलाचे पणजी स्थानकाचे अधिकारी रूपेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे शेजारी असलेल्या कुटुंबांनाही इमारतीतून बाहेर काढण्यात आले. जवानांनी त्वरित कोणताही मोठी दुर्घटना होण्याआधी दुसऱ्या मजल्यावरून जाऊन धूर व भडकलेली आग विझविण्यास सुरवात केली. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.