Goa G20 Summit Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit : ‘इलेक्ट्रिफाय गोवा’ ईव्ही रॅलीचे 22 रोजी आयोजन

सांता मोनिकाजवळून प्रारंभ ; ऊर्जा संदर्भात ‘जी-२०’बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa G20 Summit : जगभर शाश्वत ऊर्जा उपाययोजनांचा विस्तार करण्यासाठी कटिबद्ध धोरणकर्ते आणि उद्योग नेत्यांचा एक महत्त्वपूर्ण जागतिक उपक्रम म्हणून जी20 च्या ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय गटाची चौथी बैठक गोव्यामध्ये होत आहे. या बैठकीचा एक उपक्रम म्हणून 22 जुलै रोजी ‘इलेक्ट्रिफाय गोवा’ ईव्ही रॅली हा उपक्रम आयोजित केला आहे.

पणजी शहरातील सांता मोनिका जेटी येथून या रॅलीला प्रारंभ होईल आणि बांबोळी येथील प्रतिष्ठित श्यामा प्रसाद ए. मुखर्जी स्टेडियमवर या रॅलीची सांगता होईल. स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत परिवहन व्यवस्था या प्रती राज्याची वचनबद्धता या रॅलीतून प्रतिबिंबित होणार आहे.

ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (बीईई) आणि जी २० गोवा सचिवालय यांच्याद्वारे योजित या ‘इलेक्ट्रिफाय गोवा’ ईव्ही रॅलीमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच प्रतिनिधी,

इलेक्ट्रिक वाहनप्रेमी, धावपटू, सायकलस्वार सहभागी होऊन कर्बवायूंचे उत्सर्जन कमी करणे, हरित भविष्याचा प्रचार करणे आणि शाश्वत वाहतूकसुविधेला पाठबळ देण्याची गरज यावर प्रकाश टाकणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोवा राज्य या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवत असल्याचा आम्हाला आनंद आहे. स्वच्छ ऊर्जेचा वापर तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देण्याबाबत गोवा राज्य देशात आघाडीवर राहिले आहे.

जी२० बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना या महत्त्वपूर्ण जोडकार्यक्रमात सहभागी होण्याचे मी आमंत्रण देऊ इच्छितो. हरित गोव्याच्या दिशेने आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरण्याबरोबरच हा ईव्ही रॅली उपक्रम हवामान बदलाशी लढा देण्याच्या जागतिक प्रयत्नांनाही हातभार लावेल.

ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्दिष्टांशी उत्तम प्रकारे इलेक्ट्रिक वाहन रॅली संलग्न होत आहे. शाश्वत ऊर्जा पर्यायाकडे जाणाऱ्या संक्रमण काळामध्ये मुख्य घटक म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व राहणार आहे.

रमणीय निसर्गसंपदेने नटलेले आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा जोपासलेले गोवा राज्य पर्यावरणप्रिय वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श प्रदेश ठरते.

वैयक्तिक पातळीवर तसेच संस्थात्मक पातळीवर एक व्यवहार्य आणि जबाबदार वाहतूक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यास आपण गोव्यातील निसर्गरम्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या ईव्ही रॅलीचा साक्षीदार होत असताना सर्व समाजाला प्रोत्साहित करू," अशी अपेक्षा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.

इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, तंत्रज्ञान प्रदाते आणि वाहनप्रेमी यांनी आपल्या वाहनांचे प्रदर्शन करावे आणि आपल्या वाहनांबाबत तसेच इलेक्ट्रिक वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीबाबतच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ या ईव्ही रॅलीतून मिळणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढवण्यातील संधी आणि आव्हाने यावर तसेच इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगबाबत साधनसुविधांच्या उभारणीसाठी हा उपक्रम प्रभावी मंच म्हणून काम करणार आहे.

काटेकोरपणे नियोजन

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींना गोव्यातील निसर्गसफर तर होणार आहेच, त्याचबरोबर शाश्वत पर्याय व पद्धतींचा प्रचार करत इलेक्ट्रिक वाहनांच्या लाभांचाही प्रसार करणार आहेत.

राज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि शाश्वततेची बांधीलकी दर्शविण्यासाठी रॅलीचा मार्ग काटेकोरपणे नियोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जी२० परिषद बैठकांसाठीचे गोव्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT