Goa State Badminton: राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत करन धावसकर, जान्हवी महाले यांनी मारली बाजी

हर्ष, तेजन, यश, अश्मीत, साक्षीला दुहेरी किताब
Goa State Badminton:
Goa State Badminton:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa State Badminton Competition: पांडुरंग प्रभू मोये स्मृती राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत करण धावसकर, तर महिला एकेरीत जान्हवी महाले विजेती ठरली. हर्ष माने, तेजन फळारी, यश देसाई, साक्षी कुरभेळगी, अश्मीत पार्सेकर यांनी दुहेरी किताब प्राप्त केला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात झाली.

स्पर्धा म्हापसा शटलर्सने गोवा बॅडमिंटन असोसिएशन आणि क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या सहकार्याने घेतली होती. या स्पर्धेने राज्यस्तरीय 2023-24 बॅडमिंटन मोसमाला सुरवात झाली.

Goa State Badminton:
India Vs South Africa: टीम इंडिया पुन्हा दक्षिण आफ्रिकेला जाणार, टेस्ट-वनडे आणि टी-20 मालिकेचं शेड्यूल जाहीर

स्पर्श कोलवाळकर, अद्वैत बाळकृष्णन, श्रेया मेहता, सुफिया शेख, ॲस्ट्रिड डायस, मायकल रायन मॅर, अवनी ख्यालिया, अनया कामत, शेन डिसोझा, सान्वी अवदी. आरुष पावसकर, लिडिया बार्रेटो, अर्जुन भगत, सौम्या देशपांडे, मलायका लोबो, सिन्नोव्हिया डिसोझा, शिवांजली थिटे व अर्णव सराफ यांनीही आपापल्या गटात विजेतेपद प्राप्त केले.

प्रमुख अंतिम निकाल

पुरुष एकेरी ः करण धावसकर वि. वि. अयान शेख 21-15, 15-21, 21-12, महिला एकेरी ः जान्हवी महाले वि. वि. आरोही कवठणकर 21-12, 21-8.

पुरुष दुहेरी ः अर्जुन फळारी व तेजन फळारी वि. वि. फ्लॉईड अरावजो व फ्रेड्रिक फर्नांडिस 21-18, 21-15. मिश्र दुहेरी ः तेजन फळारी व लिडिया बार्रेटो वि. वि. आर्यमान सराफ व निधी देसाई 22-20, 21-19.

13 वर्षांखालील मुलगे एकेरी ः स्पर्श कोलवाळकर वि. वि. अंश चौरासिया 25-23, 21-15, दुहेरी ः अर्णव सराफ व स्पर्श कोलवाळकर वि. वि. अंश चौरासिया व सी. के. शान 21-13, 21-12.

Goa State Badminton:
Yashasvi Jaiswal : एकवेळ पाणीपुरी विकणाऱ्या जयस्वालने गाजवले कसोटी पदार्पण! शतकासह 5 मोठे विक्रम नावावर

15 वर्षांखालील मुलगे एकेरी ः अद्वैत बाळकृष्णन वि. वि. आरुष पावसकर 21-13, 15-21, 21-13, दुहेरी ः आरुष व अद्वैत वि. वि. अर्णव सराफ व ओवेस तहसिलदार 21-12, 21-13.

17 वर्षांखालील मुलगे एकेरी ः हर्ष माने वि. वि. यश देसाई 21-12, 21-12. 19 वर्षांखालील मुलगे एकेरी ः हर्ष माने वि. वि. प्रणव नाईक 21-6, 21-11.

17 वर्षांखालील मुलगे दुहेरी ः यश देसाई व अर्जुन भगत वि. वि. हर्ष माने व सी. के. शाहीन 23-21, 17-21, 21-13.

19 वर्षांखालील मुलगे दुहेरी ः यश देसाई व अश्मीत पार्सेकर वि. वि. पार्थ जोशी व श्रीजय नाईक 21-10, 21-9.

19 वर्षांखालील मिश्र दुहेरी ः अश्मीत पार्सेकर व श्रेया मेहता वि. वि. चिराग महाले व जान्हवी विर्नोडकर 21-16, 21-7.

17 वर्षांखालील मुली एकेरी ः साक्षी कुरभेळगी वि. वि. श्रेया मेहता 21-6, 21-14.

19 वर्षांखालील मुली एकेरी ः साक्षी वि. वि. आरोही कवठणकर 21-6, 21-9.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com