Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: नागरीपुरवठा खात्याच्या 'त्या' प्रकाराबाबत गोवा फॉरवर्डचा घेराव; शुक्रवारपर्यंत कारवाई न झाल्यास...

सचिवांच्या निर्देशानुसार जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात शुक्रवारपर्यंत योग्य ती कारवाई केली जाईल - नागरीपुरवठा संचालक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward नागरीपुरवठा खात्याच्या गोदामातील सडलेल्या तांदूळ प्रकरणाची चौकशी करून अहवाल खात्याच्या सचिवांना सादर करण्यात आला आहे.

येत्या दोन दिवसांत सचिवांकडून अहवाल परत आल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात शुक्रवारपर्यंत योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्‍वासन खात्याच्या संचालक उपासना माजाळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या शिष्टमंडळाला आज दिले.

मात्र शुक्रवारपर्यंत कारवाई झाली नाही तर कार्यालयातच आंदोलन सुरू करण्याचा इशारा गोवा फॉरवर्डने दिला.

गेल्या आठवड्यात गोवा फॉरवर्ड पक्षाने नागरीपुरवठा खात्यात जाऊन संचालकांना घेरले होते व सडलेल्या तांदूळ प्रकरणाला जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

रजेवर गेलेले संचालक गोपाळ पार्सेकर यांचा अतिरिक्त ताबा उपासना माजाळकर यांच्याकडे आहे. त्यांनी त्यावेळी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळाने त्‍यांना सात दिवसांची मुदत दिली होती.

ही मुदत संपल्याने आज पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माजाळकर यांना पुन्‍हा घेराव घालून दोषींवर काय कारवाई केली, असा प्रश्‍न केला.

यावेळी संचालक माजाळकर यांनी सांगितले की, सडलेल्या तांदळाच्या गोण्‍या मुरगाव, सासष्‍टी व सांगे या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत झाल्या होत्‍या. मुरगाव तालुक्यातील ४, सालसेतमधील 10 तर सांगे येथील एका स्वस्त धान्य दुकानावर या गोण्‍या पोहोचल्या.

त्यामुळे मुरगाव व सासष्‍टी तालुक्यातील गोदामप्रमुखांना तसेच त्या तालुक्यातील संबंधित नागरीपुरवठा निरीक्षकांना मेमो देऊन त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. या चौकशीअंती त्याचा अहवाल खात्याच्या सचिवांना पाठवण्यात आला आहे.

अहवालात ज्या शिफारशी नियमानुसार करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. सचिवांकडून अहवाल आल्‍यानंतर त्यांच्या सूचना व निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल.

प्रकरण दडपून टाकण्‍याचा प्रयत्‍न

नागरीपुरवठा खात्यात वारंवार असे प्रकार घडत आहेत. खात्याच्या गोदामांतून धान्य चोरी होण्याच्या घटना घडूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. तूरडाळ नासाडी प्रकरणीही माजी संचालक वगळता इतर कोणाविरोधातही कारवाई झालेली नाही.

आता सडलेल्या तांदूळ प्रकरणातही अजूनही कोणाला जबाबदार धरण्यात आलेले नाही. हे प्रकरण किरकोळ असल्याचे भासवून ते दडपण्याचा प्रकार सुरू आहे. खात्याकडून जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई होत नसल्याने त्यांच्यामध्ये भय राहिलेले नाही.

दोषींविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्‍ही गप्प बसणार नाही, असा इशारा गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिला.

सडलेल्या तांदूळ प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल नागरीपुरवठा खात्याच्या सचिवांना पाठवण्यात आला आहे. अहवालात ज्या शिफारशी नियमांनुसार करावयाच्या आहेत, त्या केलेल्या आहेत. अहवाल आल्‍यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

- उपासना माजाळकर, संचालक, नागरीपुरवठा खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT