अबकी बार पेट्रोल100 के पार Dainik Gomantak
गोवा

'अबकी बार पेट्रोल100 के पार’ कामतांचा भाजपच्या नारेबाजीला चिमटा

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत भाजपमधूनच गोवा फॉरवर्डमध्ये व्हाया काँग्रेस या मार्गाने फॉरवर्ड झालेले आहे. त्यामुळे त्यांना भाजपचे डावपेच माहीत असणारच ना?

दैनिक गोमन्तक

सध्या गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 च्या जवळ पोहोचल्याने ऐन निवडणूक वर्षाच्या मुहुर्तावर विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. गुरुवारी या दरवाढीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट केल्यावर शुक्रवारी ‘आप’ने या दरवाढीवर संपूर्ण गोव्यात निदर्शने केली. गोवा फॉरवर्डनेही या प्रश्नावरून सरकारवर टीका करण्याचे सोडले नाही.

गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी भाजपच्याच धर्तीवर ट्विट करताना ‘अबकी बार, पेट्रोल ₹100 के पार’ असे म्हणत भाजपच्या नारेबाजीला चिमटा काढला आहे. हे कामत भाजपमधूनच गोवा फॉरवर्डमध्ये व्हाया काँग्रेस या मार्गाने फॉरवर्ड झालेले. त्यामुळे त्यांना भाजपचे डावपेच माहीत असणारच ना? (Goa Forward vice-president Durgadas Kamat tweeted in the BJP's style Abki bar petrol100K par)

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. गोव्यात पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलचे दर वाढवून जनतेचे अच्छे दिन आल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्‍या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली होती. दरम्यान गोव्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने आपच्‍या कार्यकर्त्यांनी काल शुक्रवारी मडगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ निदर्शने केली व केक कापून सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध केला होता.

दरम्यान गोव्यात पेट्रोलच्या किमतीने प्रती लिटर शंभरी पार केल्याने केंद्र व राज्यातील असंवेदनशील, बेजबाबदार व नाकर्त्या भाजप सरकारचे शंभर अपराध भरले अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असताना दोन दिवसाआधी गोव्यातील काणकोण आणि सांगे या दोन टोकाच्या तालुक्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 च्या वर पोहोचले होते.काणकोण येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपये 18 पैसे असा झाला होता. मडगाव आणि पणजी येथे हा दर प्रति लिटर 99.60 रुपये एवढा होता. त्यामुळे गोव्यात आता बीअर आणि पेट्रोलचे दर सारखेच किंवा बीअर टीनच्या तुलनेत पेट्रोल महाग झाल्याचे पहायला मिळते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT