Fuel price in Goa: बीअरच्या टीन पेक्षा पेट्रोल महागले

भाजप सरकारचे (BJP Government) शंभर अपराध भरले अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.
Fuel price in Goa
Fuel price in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) दर वाढत असताना आज गोव्यात (Goa) काणकोण आणि सांगे या दोन टोकाच्या तालुक्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 च्या वर पोहोचले होते.आज सायंकाळी काणकोण येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपये 18 पैसे असा झाला होता. मडगाव आणि पणजी येथे हा दर प्रति लिटर 99.60 रुपये एव्हढा होता. त्यामुळे गोव्यात आता बीअर आणि पेट्रोलचे दर सारखेच किंवा बीअर टीनच्या तुलनेत पेट्रोल महाग झाल्याचे पहायला मिळते आहे. (Petrol became more expensive than beer can in Goa)

दरम्यान गोव्यात पेट्रोलच्या किमतीने प्रती लिटर शंभरी पार केल्याने केंद्र व राज्यातील असंवेदनशील, बेजबाबदार व नाकर्त्या भाजप सरकारचे शंभर अपराध भरले अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.

Fuel price in Goa
Tiger Anwar Case: व्हेली डिकॉस्ताचा न्यायालयाने नाकारला जामीन

गोव्यातील जनता आता त्यांना योग्य धडा शिकवीणार. गोव्यात लोकाभिमूख सरकार आणण्यास कॉंग्रेस पक्ष वचनबद्द आहे.गोमंतकीयांचे हित जपणे आमचे कर्तव्य असेल असे कामत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student Safety In Mapusa
Goa Online Financial Fraud
BNS Chargesheets Filed
42 Percent Cooperative Societies Closed
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com