तो भाजपमध्ये (BJP) आला, त्याने भाजप पाहिला, त्याने भाजप अनुभवला आणि तो भाजपच्या कमळाच्या प्रेमात पडला, अशी स्थिती कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस (Clafas Dias) यांची झाली आहे. क्लाफास डायस हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांचे नेहमी गुणगान करतात. जो मान-सन्मान कॉंग्रेसच्या (Congress) कळपात मिळाला नाही, तो कमळाच्या कळपात मिळाला म्हणून क्लाफास खूश आहेत. (Clafas Dias has decided to contest upcoming elections from BJP)
भाजपमुळेच मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो, असे ते अभिमानाने सांगतात. कमळ प्रेमात क्लाफास इतके गुरफटले आहेत, की आता त्यांनी पुढील निवडणूक कमळावरच लढविण्याचा निर्णय पक्का केला आहे. आता कुंकळ्ळीच्या चिखलात कमळ फुलते की कोमजते ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. एक मात्र खरे, ‘क्लाफासके हिम्मतकी द-ाद देनी पडेगी.’
दरम्यान क्लाफास यांना कोरोना झाला होता तेव्हा, देवाच्या कृपादृष्टीने तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माझ्या मतदारसंघातील हितचिंतकांनी व गोव्यातील जनतेने माझ्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना त्यामुळेच मी आज कोरोना महामारीच्या जबड्यातून सावरून पुनर्जन्म घेतला आहे, असे उद्गार काढले होते. त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे." असे भावनात्मक उद्गार कुकळीचे आमदार क्लाफासिओ डायस यांनी काढले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी काढले होते असं म्हणायाला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.