Vijai Sardesai Announcemen Dainik Gomantak
गोवा

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Vijai Sardesai Announcemen: गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष सक्रियपणे काम करणार असून आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जाईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे: गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष सक्रियपणे काम करणार असून आगामी निवडणुकांमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जाईल. तसेच महिलांना ३३ टक्के राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा मानस असल्याची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

कुडचडे येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमात सरदेसाई बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत, विकास भगत व इतरमान्यवर उपस्थित होते. यावेळी दत्तराज राऊत देसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सरदेसाई म्हणाले की, आजच्या राजकारणात झेड-जनरेशन (जेनझी) हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला असून युवकांशी संवाद व राजकीय कनेक्ट निर्माण करणे काळाची गरज आहे.

परत क्रांतीची ज्योत पेटवा!

गोवा क्रांतिदिनाच्या दिवशी करापूरवासीयांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे व यालाच सालाझारशाही म्हणतात. राममनोहर लोहिया यांनी जी क्रांतीची ज्योत पेटवली होती तशीच ज्योत परत एकदा पेटवण्याची गरज असून भाजप सरकारला येत्या निवडणुकीत लोकांनी खाली खेचले पाहिजे, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT