Amit shah, durgadas kamat, Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa : दुर्गादास म्हणतात शहांनी कायम यावे गोव्यात, तर पणजीकरांची एक मिनिटासाठी सभेत बोलण्याची इच्छा

अमित शहांचे गोव्यात आगमन; मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Rajat Sawant

भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. सांसद प्रचार मोहिमेअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर असून शहा यांचे दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झाले आहे. फर्मागुढी-फोंडा येथे दुपारी 4 वाजता अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यावरुन भाजप सरकारवर विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे भाजपची पहिलीच जाहीर सभा होत असून यात राज्यातील दोन्हीही मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी शहा यांच्या गोवा दौऱ्यावरुन गोव्यातील भाजप सरकारवर टिका केली आहे. केंद्रीय मंत्र्यांंच्या दौऱ्यामुळे राज्यातील कामे सरकार प्राधान्याने हाती घेणार असेल तर मंत्र्यांनी भेट देत रहावी अशी टिका केली आहे.

दुर्गादास कामत म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा राज्याच्या दौऱ्या निमित्त फार्मगुडी सर्कल येथे प्रशासनाच्या वतीने जलद गतीने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी दर आठवड्याला गोवा राज्याला भेट देत राहावी जेणेकरून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्राधान्याने कामे हाती घेईल त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल" अशी टिका कामत यांनी सावंत सरकारवर केली.

काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी शहा यांच्या गोवा दौऱ्यावरुन गोव्यातील भाजपला सवाल केला आहे. शहा यांच्या सभेत मला एक मिनिट बोलू दिले पाहिजे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे करू शकतात का? असा सवाल पणजीकर यांनी भाजपला केला आहे.

"मी भाजप नेते अमित शाह यांच्या सभेला उपस्थित राहण्यास तयार आहे. "माझी आई म्हादई" या एका विषयावर मला अमित शाह यांच्या उपस्थितीत एक मिनिटे बोलू दिले पाहिजे. भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे करू शकतात का? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी भाजपला केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

SCROLL FOR NEXT