लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा गोव्यात दाखल झाले आहेत. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शहा फार्मागुडी येथील सभेला संबोधित करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. रणशिंग लोकसभेच्या प्राचाराचे असले तरी गोमंतकीय या सभेकडे विविध अर्थानी पाहत आहेत.
अमित शहा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक देखील उपस्थित होते.
स्वागत झाल्यानंतर अमित शहा यांचा ताफा फार्मागुडीच्या दिशेने रवाना झाला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजप सत्तेवर आला, तरी देशभरात पक्षाला १६० जागांवर अत्यंत कमी मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यात दक्षिण गोव्याच्या जागेचा समावेश होता.
म्हणून पक्षाच्या रणनीतीनुसार या सर्व जागांवर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशेष लक्ष देण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून ज्येष्ठ नेते अमित शहा रविवारी गोव्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी फर्मागुढी येथे पहिलीच जाहीर सभा होत असून यात राज्यातील दोन्हीही मतदारसंघांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला येणार आहेत.
या सभेसाठी 25 हजार कार्यकर्त्यांचे लक्ष्य ठेवले असून पक्षाचे पदाधिकारी, सर्व मंत्री, आमदार, चाळीसही मतदारसंघांचे मंडळ अध्यक्ष आणि सचिव उपस्थित राहणार आहेत. सभा संपल्यानंतर अमित शहा भाजपच्या सुकाणू समितीची बैठक घेतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.