Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party: दोन विधेयकांना मंजुरी देऊ नका! विजय सरदेसाईंचे राज्यपालांना आवाहन; सरकारवर गंभीर आरोप

Goa Forward Party Latest News: विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने मंजूर केलेल्या १६ पैकी दोन विधेयके मंजूर करू नयेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारने मंजूर केलेल्या १६ पैकी दोन विधेयके मंजूर करू नयेत, अशी मागणी करणारे निवेदन गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन सादर केले.

याप्रसंगी शिष्टमंडळात सरदेसाई यांच्याबरोबर दीपक कळंगुटकर व इतर नेत्यांची उपस्थिती होती. अधिवेशनात राज्य सरकारने १६ विधेयके मंजूर केली. त्यापैकी ‘जमीन अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्रक्रियेत वाजवी मोबदला आणि पारदर्शकता (गोवा सुधारणा) विधेयक, २०२६’ आणि ‘गोवा ईझ ऑफ डुईंग बिझनेस (किरकोळ सुधारणा) विधेयक, २०२६’ या दोन विधेयकांना गोवा फॉरवर्डने आक्षेप घेतला आहे. फॉरवर्डच्या नेत्यांनी या दोन्ही विधेयकांमधील तरतुदींबाबत चिंता व्यक्त केली आणि राज्यपालांनी त्यांना मंजुरी न देण्याचे आवाहन केले.

निवेदन देऊन आल्यानंतर आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण करण्याच्या विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात सरकार जमिनी अधिगृहीत करू शकते, त्याला आम्ही विरोध केला आहे. त्याशिवाय ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’ (किरकोळ सुधारणा) या विधेयकातही सरकारचा उद्देश स्पष्ट नाही. सरकारला नवा घोटाळा करण्याची संधी मिळणार आहे, असे दिसते. त्यामुळेच राज्यपालांना आम्ही दोन्ही विधेयके मंजूर करू नयेत, अशी विनंती केली आहे. त्यांना खरोखरच गोव्याविषयी काही आपुलकी वाटत असेल तर ते त्यास मंजुरी देणार नाहीत.

‘दाल मे कुछ काला’चाच हा प्रकार : विजय सरदेसाई

सरदेसाई म्हणाले की, आम्ही दोन्ही विधेयके गोव्याच्या हिताची नसल्याचे पटवून दिले आहे. जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली जमिनी घेतल्या आणि पुढे त्या विकासकांना विकण्यात आल्या. ‘दाल मे कुछ काला है’ असा हा प्रकार आहे.

कुशावती जिल्ह्यात नवा महामार्ग तयार करताना शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत, त्यांच्या जमिनींसाठी कोण लढणार आहेत, असा सवालही त्यांनी केला.

ईझ ऑफ डुईंग बिझनेस (किरकोळ सुधारणा) या विधेयकानुसार भूखंड उद्योजकांना दिले गेल्यानंतर त्यावर खरोखरच उद्योग उभारले जाणार काय, की त्याठिकाणी निवासी इमारती उभारल्या जातील, अशी भीती वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT