Durgadas Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: मच्छीमार निधीत पाचपटीने कपात; गोवा फॉरवर्डचा आरोप

Goa Forward: राज्य मच्छीमार खाते निष्क्रीय

दैनिक गोमन्तक

Goa Forward: मच्छीमारांसाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना’ याखाली 2020-21 साली गोव्याला केंद्राकडून 41.46 कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, त्यात यावर्षी पाचपट कपात करण्यात आली आहे. 2023-24 या सालासाठी गोव्यासाठी फक्त 8.93 कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे.

भाजपच्या डबल इंजीन सरकारातील गोव्यातील इंजीन घसरले आहे आणि निधीत झालेली कपात त्यामुळेच आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस आणि प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केली आहे.

मच्छीमार खाते ज्यावेळी गोवा फॉरवर्डकडे होते त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारी योजना थेट मच्छीमारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ‘मच्छीमार कृती दल’ स्थापन केले होते.

या दलाचे अधिकारी मच्छीमारांपर्यंत जाऊन त्यांना या योजनांची माहिती देत होते. मात्र, नंतर ही योजना भाजपने गुंडाळली. मच्छीमारांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी ‘मच्छीमार कृती दल’ हा विभाग पुन्हा सक्रिय करा, असे आवाहन कामत यांनी केले आहे.

मच्छीमारांसाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना’ याखाली २०२०-२१ साली गोव्याला केंद्राकडून ४१.४६ कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, त्यात यावर्षी पाचपट कपात करण्यात आली आहे. २०२३-२४ या सालासाठी गोव्यासाठी फक्त ८.९३ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे.

भाजपच्या डबल इंजीन सरकारातील गोव्यातील इंजीन घसरले आहे आणि निधीत झालेली कपात त्यामुळेच आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस आणि प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केली आहे.

मच्छीमार खाते ज्यावेळी गोवा फॉरवर्डकडे होते त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारी योजना थेट मच्छीमारांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ‘मच्छीमार कृती दल’ स्थापन केले होते. या दलाचे अधिकारी मच्छीमारांपर्यंत जाऊन त्यांना या योजनांची माहिती देत होते. मात्र, नंतर ही योजना भाजपने गुंडाळली. मच्छीमारांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी ‘मच्छीमार कृती दल’ हा विभाग पुन्हा सक्रिय करा, असे आवाहन कामत यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: धारगळमध्‍ये होणार यंदाचा ‘आयुर्वेद दिन’

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT