Health Minister Vishwajeet Rane: राज्यात रस्ता अपघातांच्या प्रमाण वाढ! 108 रुग्णवाहिकांवर ताण

Health Minister Vishwajeet Rane: आणखी 25 रुग्णवाहिकांची आवश्‍यकता; राज्यातील आरोग्य खात्याच्या इस्पितळांवरही ताण येत आहे.
 Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak

Health Minister Vishwajeet Rane: रस्ता अपघातांचे प्रमाण राज्यात वाढ असल्याने राज्यातील आरोग्य खात्याच्या इस्पितळांवरही ताण येत आहे. आता असलेल्या 108 रुग्णवाहिका हा कमी पडत आहेत. अनेकदा त्या वेळेवर पोचत नसल्याने लोकांचा रोष असतो.

 Vishwajeet Rane
Sunburn Festival: 31 रोजी सनबर्न नाही, तिकिटांचे पैसे परत; 28 पासून तीन दिवस महाेत्सव

अपघातानंतर किमान 7 मिनिटात रुग्णवाहिका पोचणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आणखी किमान 25 तरी 108 रुग्णवाहिकांची गरज आहे. तरच काही प्रमाणात समस्या सुटेल, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केले.

बाळ्ळी-केपे येथे बालरथ उलटून झालेल्या अपघातावेळी रुग्णवाहिकांची कमतरता पडली होती. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला मंत्री राणे उत्तर देत होते. या अपघातानंतर मी लगेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

जखमींना इस्पितळात त्वरित उपचार मिळावेत, यासाठी डॉक्टरांबरोबर त्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन चर्चा करणार आहे. रस्ता अपघाताचे प्रमाण वाढल्याने आरोग्य केंद्रे तसेच इस्पितळावरही ताण पडत आहे. देशात गोव्यात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. लोकांना चांगली व लवकर सेवा मिळावी यासाठी राज्यातील भाजप सरकारचे प्रयत्न आहेत.

लुटारूंवर कारवाई! इस्पितळातून मृतदेह घरी नेण्यास गोमेकॉ इस्पितळातून मोफत शववाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. खासगी शववाहिका व रुग्णवाहिका व्यावसायिक लोकांना भरमसाट शुल्क सांगून लुटत आहेत. जर गरज पडली तर मी स्वतः माझ्या खर्चातून शववाहिका उपलब्ध करू, पण या लुटारूंना लोकांना लुटू देणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, असेही मंत्री राणे म्हणाले.

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com