Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: गाेवा फॉरवर्ड-'आप'मध्ये बोलणी; भाजपला हरविण्‍यासाठी विरोधी पक्षांची 'युती' हेच धोरण

Goa Forward AAP Alliance: आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्‍यक्ष वाल्‍मिकी नाईक आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई या दोघांनीही भाजपला हरविण्‍यासाठी विरोधी पक्षांची युती हे आपले धोरण असल्‍याचे सांगितले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: युतीबाबत काँग्रेस पक्षाकडून आवश्‍‍यक तसा प्रतिसाद मिळत नसल्‍याने गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पार्टी या दोन्‍ही पक्षांनी पर्यायी युती करण्‍याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात या दोन्‍ही पक्षांच्‍या नेत्‍यांमध्‍ये बोलणीही सुरू झाली आहेत. रविवारी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई आणि आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्‍हिएगस हे मडगावात एका व्‍यासपीठावर एकत्र आले होते.

या गोष्‍टीकडे युतीबाबतचा संकेत यादृष्‍टीने पाहिले जात आहे. आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्‍यक्ष वाल्‍मिकी नाईक आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई या दोघांनीही भाजपला हरविण्‍यासाठी विरोधी पक्षांची युती हे आपले धोरण असल्‍याचे सांगितले. आम्‍ही सगळ्‍यांनाच बरोबर घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. मात्र, काँग्रेसकडून आम्‍हाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही, अशा प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केल्‍या.

काँग्रेसकडून अधिकृत संदेश नाही!

‘आप’चे गोवा प्रदेशाध्‍यक्ष वाल्‍मिकी नाईक यांना विचारले असता, आमची सगळ्‍याच विराेधी पक्षांकडे बोलणी सुरू आहेत. मात्र, काँग्रेसकडून याबाबत आम्‍हाला अजूनही अधिकृत संदेश आलेला नाही. काँग्रेसने ‘आरजी’ला तसे पत्र पाठविले, अशाप्रकारचे कुठलेही पत्र आम्‍हाला पाठविलेले नाही. उलट त्‍यांचे आमदार आपण वेळ्‍ळीतून निवडणूक लढविणार, अशी घोषणा करत आहेत. काँग्रेसकडून अजूनही आम्‍हाला सकारात्‍मक प्रतिसाद मिळालेला नाही, असे सांगितले.

जनतेला जे हवे तेच घडेल!

विजय सरदेसाई यांना सोमवारी पणजी येथे युतीबाबत विचारले असता, ‘गोव्यातील जनतेला जे हवे आहे ते नक्कीच घडेल. मलाही असे वाटते की हे लवकर व्हायला हवे. कसेही करून, एका किंवा दुसऱ्या मार्गाने युती होईलच,’ असे त्यांनी सांगितले. काँग्रेसशी युतीबाबत काही चर्चा झाली का, असे विचारले असता, युतीबाबतची चर्चा सध्या थांबलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT