Forest Department Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Department: राज्यात वनीकरणासाठी जमीनच उपलब्ध नाही; वन खाते म्हणते, 'कॅम्पा फंड’चा उपयोग...

वन खात्याची माहिती ः निधीचा उपयोग राज्यात करणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forest Department 'कॅम्पा फंड’चा उपयोग करून वनीकरण करण्यात राज्य मागे आहे. अर्थात यास वनीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन राज्यात उपलब्ध नाही आणि इतर राज्यांमध्ये वनीकरण करण्यासाठीचा खर्च मोठा असल्याने राज्य केंद्रीय सरासरीपेक्षा मागे असल्याची माहिती वन खात्याने दिली आहे.

सरकारी वा सरकार मान्य प्रकल्पासाठी वन खात्याची जमीन वापरल्यास त्या बदल्यात दुप्पट जमिनीवर वनीकरण करणे अनिवार्य आहे.

अशा नुकसान भरपाई वनीकरणाचे लक्ष्य गाठण्यात गोव्याला यश आले नाही. वृक्षारोपणाच्या लक्ष्यापैकी केवळ ६०.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नॅशनल कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड ऑट हॉरिटीने (सीएएमपीए) अलीकडेच केलेल्या वार्षिक पुनरावलोकन अहवालानुसार हे ९०.४ टक्केच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.

३,५४१ हेक्टरच्या उद्दिष्टापैकी गोव्याने २,१४३ हेक्टरवर वनीकरण केले आहे. राज्याकडे अद्याप १,३९७ हेक्टर नुकसान भरपाईचे वनीकरण पूर्ण व्हायचे आहे. हे वनीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रलंबित असलेल्या शून्य क्षेत्राचे उद्दिष्ट साध्य करण्यास सांगितले आहे.

गोव्याने २०२३-२४ मध्ये ४७० हेक्टरचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची योजना आखली आहे आणि राष्ट्रीय प्राधिकरणाने यासाठीचा निधी मंजूर केला आहे. राज्याने यापूर्वी वनीकरणाचे अपेक्षित नुकसान भरपाईचे उद्दिष्ट गाठू न शकण्याचे कारण म्हणून जमिनीच्या कमतरतेचा उल्लेख केला होता.

ऑगस्ट २०२१ मध्ये गोव्याने राष्ट्रीय प्राधिकरणाला विनंती केली होती, की राज्यासाठी अपवाद केला जावा, त्याला मध्य प्रदेशातील नुकसानभरपाईच्या वनीकरणाची परवानगी द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT