Goa Tiger Sanctuaries: सरकारच्या 'त्या' भूमिकेचे सत्तरीतून स्वागत, सत्तरीत व्याघ्र क्षेत्र नकोच

भूमिपुत्र संघटना आक्रमक
Bhumiputra Group
Bhumiputra Group Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tiger Sanctuaries सरकारने व्याघ्र क्षेत्र नको अशी लोकांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. त्याचे आम्ही स्वागत करीत असून मुख्यमंत्री व वनमंत्री यांचे अभिनंदन करीत आहे, परंतु पर्यावरणप्रेमींकडून चाललेला व्याघ्र क्षेत्राचा अट्टहास आम्हाला मान्य नाही, अशी कडक भूमिका सत्तरी भूमिपुत्र संघटनेने वाळपई येथे पत्रकार परिषद घेऊन रविवारी स्पष्ट केली.

सत्तरी तालुक्यात 1999 साली म्हादई अभयारण्य घोषित करून ग्रामीण भागात वास्तव्य करीत असलेल्या सामान्य गरीब लोकांना संकटात टाकले होते. म्हादई अभयारण्य केवळ घोषित केले, परंतु अजूनही त्यासंबंधीच्या सीमा अंतिम करून गावाबाहेर कुंपण घातलेले नाही.

Bhumiputra Group
Goa Accidental Death: खड्डे चुकविण्याच्या नादात 32 वर्षीय तरुणाचा हकनाक बळी

त्यामुळे आजही म्हादई क्षेत्रात गाव, गावातील मंदिरदेखील समाविष्ट करण्यात आले आहे. ही समस्या सुटलेली नसताना आता ती समस्या आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. त्यांनी व्याघ्र क्षेत्राची मागणी सरकार दरबारी उचलून धरलेली आहे, पण ती आम्हाला मान्य नाही, असेही यावेळी संघटनेतर्फे सांगण्यात आले.

सत्तरी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र गावस, पदाधिकारी आंतोनियो पिंटो, बातू गावडे, शिवलो झर्मेकर, वासू केरकर यांची यावेळी उपस्थिती होती.आंतोनियो पिंटो म्हणाले, व्याघ्र क्षेत्र हे गोव्यासाठी त्रासदायक ठरणारे आहे. त्यातून लोकजीवनावर विपरीत परिणाम होणार आहे.

Bhumiputra Group
Rise In Vegetable Price: फोडणी महागली; मिरची, लसूण, आलेही वधारले

व्याघ्र क्षेत्र हे गोव्यासाठी त्रासदायक

शिवलो झर्मेकर म्हणाले, पर्यावरणप्रेमींनी व्याघ्र क्षेत्र नको या सरकारच्या निर्णयानंतर आता डंका पिटण्यास सुरवात केली आहे. शहरी भागात राहून वातानुकूलित खोलीत बसून भाषण करणे सोपे असते. ग्रामीण जीवन किती संघर्षमय असते याचा त्यांना अभ्यासच नसतो.

वाघ हा फिरणारा प्राणी आहे. सत्तरीच्या सीमेवर कर्नाटक राज्य आहे. तेथील अभयारण्यातील वाघांचा वावर असतो म्हणून सत्तरीत किंवा गोव्यात विभिन्न ठिकाणी व्याघ्र क्षेत्र करणे हे गोव्यासाठी त्रासदायक ठरणारे आहे. म्हणूनच व्याघ्र क्षेत्र कोणत्याही स्थितीत होऊ नये, असे झर्मेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com