Goa Fisheries Projects Pending Dainik Gomantak
गोवा

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

PM Matsya Sampada Yojana Goa: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री ललन सिंग यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय), मत्स्यव्यवसाय आणि जलकृषी पायाभूत सुविधा विकास निधी तसेच केंद्र सरकारच्या इतर प्रायोजित योजनांतर्गत गेल्या सहा वर्षांत राज्यात उभारण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी १४७.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, त्यापैकी केवळ ४७.०८ कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात आले असून, सुमारे १०० कोटी रुपयांचे प्रकल्प अद्याप रखडले आहेत.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री ललन सिंग यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय), मत्स्यव्यवसाय आणि जलकृषी पायाभूत सुविधा विकास निधी तसेच केंद्र सरकारच्या इतर प्रायोजित योजनांतर्गत गेल्या पाच वर्षांत गोव्यासाठी मंजूर केलेले प्रकल्प, वर्षनिहाय अर्थसंकल्पीय तरतूद, वितरित केलेले केंद्रीय सहाय्य आणि झालेला खर्च यांचा तपशील तानावडे यांनी मागितला होता.

त्यावर २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षांच्या कालावधीत प्रकल्पांसाठी गोव्याला १४७.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये केंद्राचा वाटा ७२.१६ कोटी रुपये इतका होता. त्यापैकी ५३.०२ कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या १४७.२१ कोटी रुपयांपैकी केवळ ४७.०८ कोटी रुपयांचे प्रकल्प या सहा वर्षांत पूर्ण झाले असल्याचे मंत्री सिंग यांनी उत्तरात सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.

दरम्यान, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांचा गोव्यातील किती मच्छीमार, मत्स्यपालक, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि स्वयं सहायता गटांना फायदा मिळाला, असाही प्रश्न तानावडे यांनी विचारला होता. त्यावर या प्रकल्पांचा ४६३ जणांना फायदा मिळाल्याचे मंत्री सिंग यांनी नमूद केले आहे.

गेल्‍या सहा वर्षांतील आकडेवारी (कोटींत)

वर्ष प्रकल्‍पांसाठी मंजूर निधी केंद्राचा वाटा मंजूर निधी खर्च

२०२०–२१ ३३ ११.९२ ५.९६ ५.९६

२०२१–२२ ४३.४९ २४.७६ १६.४५ १६.४५

२०२२–२३ १३.४३ ५.६८ १०.५९ १०.५९

२०२३–२४ ९.७९ ३.३७ ११.३० ५.३६

२०२४–२५ ८.०४ २.८१ ३.३७ ३.३७

२०२५–२६ ३९.४६ २३.६२ ५.३५ ५.३५

एकूण १४७.२१ ७२.१६ ५३.०२ ४७.०८

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

Viral Post: हद्दच झाली राव! नोकरीसाठी अर्जच केला नाही, पण कंपनीकडून आला थेट 'रिजेक्शन मेल'; जॉब मार्केटची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT