Goa Blue Revolution Fund: 'नीलक्रांती'साठी केंद्राकडून राज्‍याला 20 कोटी, मत्‍स्‍योद्योगमंत्री ललन सिंह यांची माहिती

Goa Blue Revolution: मत्‍स्‍य उत्‍पादनात वाढ करून ‘नीलक्रांती’ घडवून आणण्‍यासाठी केंद्र सरकारने गेल्‍या तीन वर्षांत गोवा राज्‍यासाठी सुमारे २९.८१ कोटींचा निधी मंजूर केलेला होता.
Goa Blue Revolution Fund
Goa Blue Revolution FundDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मत्‍स्‍य उत्‍पादनात वाढ करून ‘नीलक्रांती’ घडवून आणण्‍यासाठी केंद्र सरकारने गेल्‍या तीन वर्षांत गोवा राज्‍यासाठी सुमारे २९.८१ कोटींचा निधी मंजूर केलेला होता. त्‍यातील सुमारे २० कोटी रुपये आतापर्यंत राज्‍याला मिळालेले आहेत. केंद्रीय मत्‍स्‍योद्योगमंत्री ललन सिंह यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

गोव्‍यासह इतर किनारी राज्‍यांतील मत्‍स्‍य उत्‍पादनात वाढ करून देशात ‘नीलक्रांती’ घडवून आणण्‍यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, त्‍याअंतर्गत संबंधित राज्‍यांना कोट्यवधींचा निधीही देत आहे.

Goa Blue Revolution Fund
Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

याअंतर्गत २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत देशातील ३४ राज्‍यांना सुमारे ३.१५ लाख कोटींचा निधी निश्‍चित करण्‍यात आलेला होता. त्‍यातील सुमारे २.२० लाख कोटी वितरित करण्‍यात आलेले आहेत. या कालावधीत २९.८१ कोटींची तरतूद करण्‍यात आली होती.

Goa Blue Revolution Fund
Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

त्‍यातील सुमारे २० कोटींचा निधी या तीन वर्षांत राज्‍याला देण्‍यात आलेला आहे, असे मंत्री सिंग ललन सिंह यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com