Goa Fire Services Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Services: गोव्यात प्रथमच 42 मीटर टर्न टेबल लॅडर वाहन ताफ्यात; अग्निशमन दलात 18 अत्याधुनिक वाहने, 23 कोटींची गुंतवणूक

Hazmat Response Vehicle Goa: ही वाहने काणकोण, कुडचडे, वास्को, पिळर्ण, पेडणे, मडगाव आणि फोंडा येथील केंद्रांवर तैनात केली आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षितता अधिक सक्षम करण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने आपल्या ताफ्यात १८ नवीन अत्याधुनिक वाहने दाखल केली आहेत. यामध्ये देशातील पहिले ४२ मीटर उंचीपर्यंत पोहोचणारे टर्न टेबल लॅडर वाहन, आठ मिड-साईज वॉटर टेंडर्स, एक हॅझमॅट रिस्पॉन्स वाहन आणि आठ साहाय्यक मोटारसायकलींचा समावेश आहे.

या सर्व वाहनांची एकूण किंमत सुमारे २३ कोटी रुपये आहे.आठ वॉटर टेंडर्सची भरटाटा चॅसिसवर आधारित आठ मिड-साईज वॉटर टेंडर्स खरेदी केले आहेत. त्यापैकी पाच वाहने १५ व्या वित्त आयोग निधीतून, तर तीन वाहने राज्य सरकारच्या निधीतून घेतली आहेत.

ही वाहने काणकोण, कुडचडे, वास्को, पिळर्ण, पेडणे, मडगाव आणि फोंडा येथील केंद्रांवर तैनात केली आहेत.हॅझमॅट रिस्पॉन्स वाहनधोकादायक रासायनिक गळती, औद्योगिक अपघात आणि विशेष बचाव मोहिमांसाठी ५.३९ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक हॅझमॅट वाहन खरेदी केले आहे.

यामध्ये संरक्षणात्मक सूट, श्वसन यंत्रणा, हायड्रॉलिक रेस्क्यू टूल्स, जनरेटर, पाण्याची टाकी आणि उच्च-दाब पंप यांसारखी आधुनिक साधने आहेत.आठ नव्या मोटारसायकल्सअग्निशमन दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी आणि अधिकृत पाहणीसाठी आठ नवीन मोटारसायकल्स खरेदी केल्य आहेत.

जीपीएस ट्रॅकिंगची सुविधा सर्व नवीन वाहनांमध्ये जीपीएस आधारित ट्रॅकिंग प्रणाली बसविली आहे. त्यामुळे पणजी येथील नियंत्रण कक्षातून वाहनांचे थेट लोकेशन पाहता येणार असून आपत्कालीन प्रसंगात जलद प्रतिसाद देणे आणि संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे.

हायड्रॉलिक शिडी आणि प्रशस्त बचाव पिंजरा

सुमारे ११.४१ कोटी रुपये खर्चून खरेदी केलेले ४२ मीटर टर्न टेबल लॅडर हे वाहन उंच इमारतींमधील आग विझविणे आणि बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ३६० अंश फिरणारी हायड्रॉलिक शिडी आणि बचाव पिंजरा (रेस्क्यू केज) यांमुळे ४० मीटरपर्यंतच्या इमारतींमध्ये आपत्काळात मदत करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT