Goa Nightclub Fire: लुथरा बंधू आज गोव्यात, 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड; गोवा पोलिसांनी दिल्लीत घेतला ताबा

Luthra Brothers Arrested: हडफडे येथील ‘बर्च’ दुर्घटनेला जबाबदार लुथरा बंधूंचा मंगळवारी दुपारी गोवा पोलिसांनी दिल्लीत अधिकृत ताबा घेतला.
Luthra Brothers Arrested
Luthra Brothers ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च’ दुर्घटनेला जबाबदार लुथरा बंधूंचा मंगळवारी दुपारी गोवा पोलिसांनी दिल्लीत अधिकृत ताबा घेतला.

मंगळवारी सायंकाळी उशिरा दोघाही संशयितांना इंदिरा गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, द्वारका येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथून पटियाला कोर्टात संशयितांना हजर केले असता, न्यायालयाने दोघांना ४८ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला. जेणेकरून गोवा पोलिस संशयितांना घेऊन गोव्यात परतण्यासाठी कायदेशीररित्या प्रवास करू शकतील.

लुथरा बंधूंना गोव्यात बुधवारी (ता. १७ डिसेंबर) सकाळी आणले जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दिल्लीहून सकाळी ८ वाजताच्या विमानाने गोवा पोलिसांचे पथक लुथरा बंधूंना घेऊन मोपा विमानतळावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उतरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्‍यान, नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी आज आणखी तीन क्‍लबना टाळे ठोकण्‍यात आले.

Luthra Brothers Arrested
Goa Drowning Death: शेजाऱ्याकडे ठेवला, खेळताना तळ्यात पडला; तळेबांद येथे दीड वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू

लुथरा बंधूंना आणण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक सोमवारी सायंकाळी दाबोळी विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते. हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’मध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने गोव्यासह संपूर्ण देश हादरला होता.

मात्र, या आगीच्या घटनेनंतर, या क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे दोघे भाऊ फुकेत-थायलंडला पसार झाले होते. त्यानंतर गोवा पोलिसांच्या विनंतीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने इंटरपोलने फरार लुथरा बंधूंच्या विरोधात, ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. तसेच, भारताकडून लुथरा बंधूंचे पासपोर्ट देखील निलंबित करण्यात आले होते.

या घडामोडीनंतर थायलंड पोलिसांनी दोघाही संशयितांना फुकेतमध्ये ताब्यात घेतले आणि नंतर भारताकडे त्यांचा ताबा देण्यासाठी प्रत्यार्पण (डिपोर्ट) प्रक्रिया राबविली. दोघांनाही थायलंडवरून मंगळवारी (ता. १६ डिसेंबर) दुपारी नवी दिल्लीत विमानाने आणण्यात आले.

नंतर गोवा पोलिसांनी लुथरा बंधूंचा अधिकृत ताबा घेतला. त्यांची आधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर दोघांनाही सायंकाळी पटियाला कोर्टात हजर केले. तिथे न्यायालयाने दोघांना ४८ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला. त्यामुळे संशयितांना घेऊन गोवा पोलिस बुधवारी सकाळी मोपा विमानतळावर दाखल होतील.

बर्च क्लबमध्ये ६ डिसेंबरला रात्री उशिरा भीषण आग लागल्यानंतर अवघ्या दीड तासाच्या आत या दोघाही बंधूंनी दिल्लीतून थायलंडचे तिकीट बुक केले होते. थायलंडमध्ये ते फुकेत येथील एका हॉटेलमध्ये राहात होते आणि तिथेच नजीकच्या रेस्टॉरंटमध्ये जेवत होते.

ब्ल्यू कॉर्नर नोटिसीनुसार थायी पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले होते. संपूर्ण कायदेशीर औपचारिकतेमुळे फरार लुथरा बंधूंना भारतात आणायला साधारण आठ दिवस लागले.

Luthra Brothers Arrested
Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

भारत-थायलंड; लुथरा बंधूंचा थरारक प्रवास

बर्च’ दुर्घटनेनंतर लुथरा बंधू दिल्लीहून विमानमार्गे फुकेत-थायलंडमध्ये पळाले. कालांतराने भारतीय केंद्रीय तपास यंत्रणेने लुथरांचे पासपोर्ट केले निलंबित. तसेच इंटरपोलकडून दोघांविरोधात ‘ब्ल्यू कॉर्नर’ नोटीस जारी केली.

भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीवरून थायी पोलिसांनी लुथरा बंधूंना थायलंडमधील येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचे भारताकडे प्रत्यार्पण (डिपोर्ट) करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. यासाठी गोवा पोलिसांनी बरेच परिश्रम घेतले.

दोघांना सोमवारी बँकॉक येथील एका इमिग्रेशन सुविधेत हलविले. तिथे त्यांना भारतीय केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यात दिले.

लुथरा बंधूंचे पासपोर्ट जप्त केल्यानंतर त्यांना भारतात येण्यासाठी बँकॉक येथील भारतीय दूतावासाने आपत्कालीन प्रमाणपत्र जारी केले. त्यानंतर औपचारिकता व दस्तावेज पूर्ण झाल्यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेने वेग धरला.

भारतीय अधिकारी दोघांना घेऊन मंगळवारी दिल्ली विमानतळावर पोचले. तेथे गोवा पोलिसांनी लुथरा बंधूंचा अधिकृतरित्या ताबा घेतला.

सायंकाळी संशयितांना इंदिरा गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-द्वारका येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

नंतर लुथरा बंधूंना ट्रान्झिट रिमांडसाठी पटियाला न्यायालयात हजर केले. लुथरा बंधूंविरोधात भक्कम खटला उभा करण्याकरिता तांत्रिक पुरावे आणि कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे.

नियम उल्‍लंघन : आणखी तीन क्‍लबना ठोकले टाळे

हडफडे येथील बर्च क्लबमधील भीषण अग्नितांडवानंतर, राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या क्लब्सविरोधात कडक मोहीम राबविली आहे. या मोहिमेअंतर्गत संयुक्त अंमलबजावणी समितीकडून किनारी भागातील क्लब व रेस्टॉरंट यांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत वागातोर, हणजूण परिसरातील सहा क्लबना टाळे ठोकण्यात आले.

मंगळवारी संयुक्त अंमलबजावणी समितीने आणखी तीन क्लब सील केले. ज्यामध्ये वागातोर येथील ‘सलुद’, ‘क्लारा’ आणि ‘मायन’ या तीन क्लबसह त्यांची जागा आवश्यक सुरक्षा परवानग्यांशिवाय कार्यरत असल्याच्या कारणावरून सील केली. यापूर्वी ‘गोया’, ‘सीओ - २’, ‘डियाज’ हे क्लब सील केले होते. तर दक्षिण गोव्यातील ‘केप गोवा’ हे हॉटेलही बंद केले आहे.

आतापर्यंतची कारवाई

या प्रकरणात आतापर्यंत लुथरा बंधूंचे भागीदार अजय गुप्ता, चीफ जनरल मॅनेजर राजीव मोडक, गेट मॅनेजर प्रियांशू ठाकूर, बार मॅनेजर राजवीर सिंघानिया, जनरल मॅनेजर विवेक सिंग आणि ऑपरेशन मॅनेजर भरत कोहली यांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com