fertilizer prices increase in Goa affects farmers Dainik Gomantak
गोवा

Goa Farming Crisis: खत महागले, शेतकऱ्यांचे गणित बिघडले; इंधन दरवाढीचा परिणाम, सरकारने हस्तक्षेप करावा, शेतकऱ्यांची मागणी

Fertilizer Price Hike Goa: राज्यात आणि देशात दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरात वाढ होत असतानाच आता बळीराजाही या महागाईच्या दुष्ट चक्रात सापडला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: राज्यात आणि देशात दैनंदिन वापरातील वस्तूंच्या दरात वाढ होत असतानाच आता बळीराजाही या महागाईच्या दुष्ट चक्रात सापडला आहे. विशेष म्हणजे कसदार शेतीसाठी उपयुक्त ठरलेल्या खतांच्या किमतीत प्रतिकिलो सरासरी ४ रुपयांची दरवाढ झाल्याने त्याचा फटका शेतकरी आणि बागायतदारांना बसला आहे. त्यामुळे शेती कसायची कशी? हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

इंधन दरवाढीमुळे खतांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सरकारने या किमतीतील दरवाढ रोखणे आवश्यक आहे, असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.

महागाई झपाट्याने वाढत असतानाच ऐन पेरणीच्या वेळी शेतीभाती करणाऱ्यांच्या पाठीशी हे दरवाढीचे शुक्लकाष्ट लागल्याने त्यातच शेती कसण्यासाठी इतर समस्याही भेडसावत असल्याने शेती करायची की नाही, या विचारात शेतकरी पडला आहे.

खतांच्या दरात बुधवारी वाढ लागू झाली आहे. राज्यातील बागायतदार संस्था तसेच इतर सहकारी संस्थांमधून खताची विक्री करण्यात येते. फोंड्यात तर किमान पाच हजार शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. नोकऱ्या नसल्याने उपजीविका चालवण्यासाठी अनेकांनी शेतीबागायतीत लक्ष घातले आणि बऱ्यापैकी उत्पादनही घ्यायला सुरवात केली; पण अनेक समस्यांना तोंड देत या शेतकऱ्यांनी शेतीबागायती टिकवून ठेवली. मात्र, आता महागाईच्या झळा तीव्र होत चालल्याने शेतीबागायती करायची कशी, हा सवाल निर्माण झाला आहे.

दरवाढ ठरेल जाचक!

परदेशातील युद्धामुळे इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा फटका खत दरालाही बसला आहे. युद्धामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना ही दरवाढ जाचक ठरेल, असे गोवा बागायतदारचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

नफ्यात घट शक्य!

खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ होणार आहे. विशेषतः बागायती पिकांसाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर होत असल्याने त्यांना फटका बसणार आहे. बियाणे, मजुरी, औषधे आणि सिंचनाचा खर्च आधीच वाढलेला असताना खतदरवाढीमुळे लहान व मध्यम शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असून त्यांच्या नफ्यात घट होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT