Goa Farming: मान्सूनपूर्व सरींचा अंदाज घेत गोव्यात खरिपाची लगबग; बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

Goa Kharif Season Agriculture: राज्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने होणार असल्याचा अंदाज असला, तरी गोव्यातील बळीराजा नव्या उत्साहाने शेतीच्या कामांत गुंतला आहे.
Goa Kharif Season Agriculture
Goa FarmingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात मान्सूनचे आगमन काहीसे उशिराने होणार असल्याचा अंदाज असला, तरी गोव्यातील बळीराजा नव्या उत्साहाने शेतीच्या कामांत गुंतला आहे. ग्रामीण तसेच किनारी भागातील शेतांमध्ये सध्या खरीप हंगामाची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे. कृषी संचालनालयही सर्व प्रकारच्या सोयी-सुविधांनी सज्ज झाले आहे. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये सध्या रासायनिक खतांचा आणि दर्जेदार बियाण्यांचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

मात्र, गोव्यातील शेतकऱ्यांना अशा कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, राज्यात खते आणि बियाण्यांची टंचाई नसल्याचे कृषी संचालनालयाचे उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी दिली आहे. मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेत अनेक भागांतील शेतकऱ्यांनी भात पेरणी, शेतजमिनीची मशागत आणि पारंपरिक पावसाळी भाजीपाल्याच्या लागवडीला सुरुवात केली आहे. पूर्वी बैलजोडीच्या साहाय्याने नांगरणी केली जायची परंतु आता काही भागात ट्रॅकर आदी वापरले जात आहेत.

Goa Kharif Season Agriculture
Goa Fishing Season: दहा दिवसांपूर्वीच बोटी धक्क्यावर! यंदा मासळी कमीच, हंगामाची आज सांगता; मजूरही परतले गावाला

काहीजण कुदळीने चर काडून भातपेरणी केली जात आहे. पावसाळ्यात राज्यात प्रामुख्याने भातशेती, काटेकणगी लागवड, भाजीपाला, अळूमाडी लावणे आदी विविध प्रकारची शेती केली जाते. शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जास्तीत जास्त जमिनीवर पिकांची लागवड करावी.

कृषी संचालनालयामार्फत मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरवरील अनुदान, बियाण्यांवरील सवलत, तसेच सिंचन सुविधांसाठी आर्थिक मदत दिली जाते. या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Withdrawal From Rajasthan
Goa Monsoon 2026
Goa Fishing Season
Wild Vegetables in Monsoon
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com