Goa Agriculture: गोव्यातील बागायतदारांना सुगीचे दिवस! यंदा आंबा-काजू उत्पादनात तब्बल 30 टक्के वाढ, काही वर्षांतील घसरण थांबली

Goa Mango And Cashew Production: राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून आंबा आणि काजू उत्पादनात घट नोंदविली जात होती.
Goa Agriculture
Goa Mango And Cashew ProductionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून आंबा आणि काजू उत्पादनात घट नोंदविली जात होती. मात्र, यंदा या दोन्ही प्रमुख पिकांचे समाधानकारक उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आंबा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून काजू उत्पादनही अपेक्षेप्रमाणे मिळाल्याची माहिती कृषी संचालनालयाचे उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी दिली.

दरवर्षी हवामानातील बदल, अवेळी पाऊस किंवा उष्णतेमुळे काजूचा मोहोर करपण्याच्या घटना घडत असतात. यंदाही काही प्रमाणात मोहोर करपला होता. विशेषतः काजूच्या दुसऱ्या पाड्यात अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. मात्र पहिला आणि शेवटचा पाडा चांगला झाल्याने एकूण उत्पादन समाधानकारक राहिले. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणे मोठी घट यंदा नोंदविली जाणार नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Goa Agriculture
निरा, हुर्राक, फेणी! 16 व्या शतकात, पोर्तुगीज काळात गोव्यात रोवलेल्या काजूच्या पहिल्या रोपाची झाडावेगळी अद्वितीय रूपे

कोकण पट्ट्यातील काही भागांत यंदा आंबा आणि काजू उत्पादनात घट झाली असली, तरी गोव्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. उलट उत्पादनात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. मागील चार-पाच वर्षांपासून सातत्याने काजू उत्पादनात होत असलेली घसरण यंदा थांबली असून राज्यातील बागायतदारांसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.राज्यातील काही भागांत अजूनही काजूची काढणी सुरू असून काही ठिकाणी काजू प्रक्रिया भट्ट्याही कार्यरत आहेत.

यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन झाले आहे. मानकुराद तसेच इतर जातींचे आंब्याचे पीकही चांगले आले आहे. काजूचे पीक मध्यंतरी काही प्रमाणात घटले होते; मात्र आता समाधानकारक उत्पादन मिळत आहे.

- सुनील हरवळकर, युवा शेतकरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com