FDA Raid Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: 'एफडीए' ॲक्‍शन मोडवर! नावेलीत रेस्टॉरंटवर कारवाई, म्‍हापशात 120 किलो आंबे नष्‍ट

FDA action Navelim Mapusa: गोवा अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने (एफडीए) अन्न सुरक्षेच्या दृष्‍टीने नावेली (सासष्‍टी) व म्‍हापसा येथे बुधवारी कारवाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने (एफडीए) अन्न सुरक्षेच्या दृष्‍टीने नावेली (सासष्‍टी) व म्‍हापसा येथे बुधवारी कारवाई केली. नावेलीतील एका रेस्टॉरंटमध्‍ये काही त्रुटी आढळून आल्‍या. त्‍यामुळे त्‍या रेस्‍टॉरंटला त्रुटी दूर करण्‍यासाठी सात दिवसांची मुदत देण्‍यात आली आहे.

एफडीए अधिकाऱ्यांनी नावेलीत तीन रेस्टॉरंट्सवर छापा टाकला. त्‍यात एक फॅमिली रेस्टॉरंट अत्यंत अस्वच्छ स्‍थितीत आढळले. त्‍यास सात दिवसांची मुदत देण्‍यात आली असून, त्‍यानंतर पुन्हा तपासणी करण्‍यात येईल. स्थिती योग्य आढळल्यासच त्यास परवानगी दिली जाईल. अन्‍य दोन रेस्टॉरंट्स्‌ची देखील सात दिवसांनी तपासणी होणार आहे.

पणजीसह तिसवाडीत चार आस्‍थापने बंद

तिसवाडी तालुक्यातील गोवा वेल्हा, सांतिनेज आणि पणजी परिसरात ‘एफडीए’ पथकाने आज बुधवारी संध्याकाळी धडक मोहीम राबविली. त्‍यात बारा हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्‌सची तपासणी करून चार आस्‍थापने बंद करण्‍यात आली.

राजधानी पणजीतील १८ जून रोडवरील एक हॉटेल, सांतिनेजमधील दोन आस्‍थापने आणि गोवा वेल्हातील एका आस्‍थापनावर ही कारवाई करण्‍यात आली. नियमभंग केल्‍यामुळे तीन विक्रेत्यांना एकूण ११ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ‘एफडीए’ संचालक श्‍‍वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रिचर्ड नोरोन्हा (डिझिग्नेटेड अधिकारी), श्रद्धा खुटकर (वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी) आणि पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

रासायनिक आंबे

म्हापसा बाजारात स्टॉल क्रमांक १४ वर ६० क्रेट्स (सुमारे १२० किलो) रायगड येथील रसायनयुक्त आंब्यांची विल्हेवाट लावण्यात आली. एफडीए आणि म्हापसा नगरपालिकेच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

आंबेविक्रेत्यांनी सादर केलेल्या बिलावरून हे आंबे कृत्रिमरीत्या पिकवले गेले असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सार्वजनिक हित लक्षात घेऊन हे आंबे नष्ट करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT