Fake RTO E Challan Dainik Gomantak
गोवा

Fake RTO E Challan: 'आरटीओ ई-चलन'च्या नावाखाली सायबर सापळा; APK File उघडताच मोबाईल हॅक, स्मार्टफोन युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर

Fake RTO E Challan Scam: सरकारने राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित वाहतूक देखरेख आणि ऑनलाइन ई-चलन प्रणाली अधिकृतपणे सुरू केल्याला २४ तास देखील उलटले नाहीत आणि सायबर गुन्हेगारांनी जनतेच्या अनभिज्ञतेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सरकारने राज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित वाहतूक देखरेख आणि ऑनलाइन ई-चलन प्रणाली अधिकृतपणे सुरू केल्याला २४ तास देखील उलटले नाहीत आणि सायबर गुन्हेगारांनी जनतेच्या अनभिज्ञतेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे.

अधिकृत ‘आरटीओ ई-चलन’ ॲप्लिकेशन असल्याचे भासवून व्हॉट्स ॲपवर एक घातक ‘एपिके’ फाईल मोठ्या प्रमाणात पाठविली जात आहे. ही फाईल उघडल्यावर मोबाईल हॅक होऊन बंद पडतो आणि मोबाईलचे संपूर्ण नियंत्रण हॅकरकडे जाते.

राज्यातील काही स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. ‘आरटीओ ई-चलन एपिके’ (आकार : ६.३ एमबी) नावाच्या या फसव्या फाईल्स व्हॉट्स ॲप मेसेजद्वारे पाठवल्या जात आहेत.

सरकारी मोहिमेचा गैरफायदा

१६ जुलै रोजी गोवा सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना थेट ऑनलाईन पोर्टल आणि एसएमएसद्वारे ई-चलन पाठवण्यासाठी एआय कॅमेरा नेटवर्क सक्रिय केले होते. वाहतूक शिस्त आणि पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलले आहे.

परंतु, सायबर चोरांनी याच घोषणेचा गैरफायदा घेत हुबेहूब सरकारी प्रक्रियेसारखे दिसणारे बनावट ॲप तयार केले. दंडाच्या भीतीपोटी आणि तांत्रिक माहितीच्या अभावामुळे नागरिक या जाळ्यात सहज अडकत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT