Goa Heavy Rain: पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला, पण सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे रस्ते जलमय, जनजीवन ठप्प

Goa Weather Update: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. भातशेतीसह अन्य पिकांना पाण्याची तीव्र गरज होती.
Goa Heavy Rain
Goa Heavy RainDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. भातशेतीसह अन्य पिकांना पाण्याची तीव्र गरज होती. गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने दिलासा दिला. मात्र, सत्तरीत ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

सांगेत सर्वाधिक ५.२५ इंच पाऊस

मागील २४ तासांत राज्यात सरासरी १.६४ इंच पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ३७.६४ इंच पावसाची नोंद केली आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ५.२५ इंच पावसाची नोंद सांगेत करण्यात आली. त्याखालोखाल वाळपईत ४.८० इंच, केपे ३.१७ इंच, साखळी २.७० इंच, फोंडा १.८० इंच, धारबांदोडा १.०३ इंच, काणकोण २३.२ मिमी, पेडणे २१.२ मिमी, जुने गोवे १५.३ मिमी, मुरगाव १४. मिमी, दाबोळी ८ मिमी, म्हापसा ७ मिमी, तर पणजीत ६.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Goa Heavy Rain
Goa Heritage: विस्मृतीत गेलेला भिरोंड्याचा इतिहास

काणकोणात इंचांचे अर्धशतक

आतापर्यंत राज्यात ३७ इंच पावसाची नोंद झाली असली तरी काणकोणात पावसाने अर्धशतक केले. काणकोणात ५०.८४ इंच पावसाची नोंद केली आहे.

मागील २४ तासांत अग्निशमन दलाला एकूण १३ कॉल्स आले त्यापैकी ११ हे पावसामुळे होणाऱ्या पडझडीचे होते. मागील २४ तासांत ६० हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर २ लाख २० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

Goa Heavy Rain
Goa Rain Update: ब्रेकनंतर पावसाचा जोरदार पुनरागमन! सांगे, वाळपईत रस्ते जलमय; नागरिकांची तारांबळ

 

काही गावांचा संपर्क तात्पुरता तुटला : परिस्थिती नियंत्रणात

  • पाली दत्त मंदिर परिसरासह अनेक भागांत नदीचे पाणी

  •  कोपार्डे, वेळूस, गुंडेलवाडा, सातोडे, गुळेली, पैकुळ, मुरमुणे आदी भागांतील रस्ते पाण्याखाली

  •  काही गावांचा संपर्क तात्पुरता तुटला; वाहतुकीवर मोठा परिणाम

  •  वेळूस येथील शेतकरी रामा गावकर यांची संपूर्ण बागायती पाण्याखाली

  •  अग्निशमन दलाने पुराच्या पाण्यात अडकलेली कार बाहेर काढली

  •  कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना नाही

  •  दुपारनंतर पावसाचा जोर कमी; प्रशासनाच्या मते परिस्थिती नियंत्रणात

  •  सर्वण येथे वीजवाहिनी आणि रस्त्यावर जंगली वृक्षाची पडझड

  •  मासोर्डे पीटीएस प्रशिक्षण शाळेजवळ कोसळले झाड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com