Fake parcel delivery scam Dainik Gomantak
गोवा

Fake Parcel Scam: सावधान! 35 रुपये भरण्यासाठी लिंक पाठवली, 1 लाख लुटले; गोव्यात ‘फेक पार्सल स्कॅम'चा धुमाकूळ

Fake parcel delivery scam: १०.२५ ते २५ रुपये भरण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी दोन नागरिकांकडून एकूण १ लाख ११ हजार २० रुपयांची लूट केली आली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात ‘फेक पार्सल डिलिव्हरी’ फसवणुकीचे दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. १०.२५ ते २५ रुपये भरण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी दोन नागरिकांकडून एकूण १ लाख ११ हजार २० रुपयांची लूट केली आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, बनावट एसएमएस किंवा ई-मेलद्वारे “पार्सल डिलिव्हरी अयशस्वी झाली आहे” असा संदेश पाठवून त्यासोबत एक लिंक देण्यात येते. त्या लिंकवर क्लिक करून “पुन्हा डिलिव्हरीसाठी छोटा शुल्क भरा” किंवा “पत्ता अपडेट करा” असे सांगितले जाते. मात्र, ही लिंक उघडताच नागरिक थेट फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात आणि ओटीपी टाकल्यावर खात्यातील रक्कम मोठ्या प्रमाणात लुटली जाते.

पणजीतील एका महिलेच्या मोबाईलवर इंडिया पोस्टच्या नावाने संदेश आला आणि पार्सल मिळण्यासाठी १०.२५ भरण्याची विनंती करण्यात आली. तिने लिंक उघडून कार्ड माहिती आणि ओटीपी टाकताच तिच्या क्रेडिट कार्डवरून २५,७८२ रुपयांची रक्कम गायब झाली. दुसऱ्या प्रकरणात एका पुरुषाला डीटीडीसी कुरिअरच्या नावाने संदेश आला.

लिंक उघडताच त्याने २५ रुपये भरण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, फसवेगिरीच्या साईटने ओटीपी आपोआप पकडताच त्यांच्या खात्यातून ८५,२३८ रक्कम तत्काळ डेबिट झाली.

सायबर क्राईम विभागाचा इशारा

सायबर क्राईम विभागाने नागरिकांना यासंदर्भात कडक इशारा दिला आहे. अपरिचित लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी, कार्ड माहिती, युपीआय पीन कोणालाही देऊ नये आणि कोणतीही आर्थिक गडबड झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद लिंकची पडताळणी www.virustotal.com किंवा www.spotthescam.in वर करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

सूर्य दोनापावला ठिकाणी जुवारीच्या मुखात लांब जात म्हणतो, ‘कदंब, बेतीवरे, पर्वरी, बांबोळी, वेर्णा आणि साकवाळ पठारे म्हातारी झाली’

SCROLL FOR NEXT