Goa Illegal liquor Seizure Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Excise Department liquor Seizure: तसेच १५ लाख रुपये किमतीचा एमएच-४५-एएक्स-३७०६ क्रमांकाचा ट्रकही ताब्यात घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेडणे : न्हयबाग येथील तपासणी नाक्यावर अबकारी विभागाने २८ रोजी रात्री ९.३० वाजता महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात येणारी ३ लाख ७८ हजार ९०० रुपये किमतीची दारू जप्त केली.

जप्त केलेल्या दारूमध्ये व्हिस्की व रमचा समावेश आहे. तसेच १५ लाख रुपये किमतीचा एमएच-४५-एएक्स-३७०६ क्रमांकाचा ट्रकही ताब्यात घेण्यात आला. न्हयबाग येथील तपासणी नाक्यावर ट्रक थांबविल्यानंतर अबकारी कर्मचाऱ्यांनी चालकाकडे चौकशी केली.

त्यावेळी ट्रकमध्ये भाताचा कोंडा असून तो पुण्याला घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. उपनिरीक्षक लक्षदीप कुंकळकर व हवालदार बिंदेश पेडणेकर यांनी ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये भाताचा कोंड्याच्या पोत्यांमागे दारूचे खोके लपवल्याचे आढळून आले.

ट्रकचालक ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (रा. सोलापूर) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.पेडणे अबकारी कार्यालयाचे निरीक्षक विक्रांत कोरगावकर व सलील वळवईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT