Goa Electricity Department Twit on Power cuts Dainik Gomantak
गोवा

मी तुमच्यापैकीच एक, माझ्याघरीही वीज नाही, गोवा वीज खात्याच्या ट्विटचा नेटवर धुमाकूळ

वीज खात्याच्या याच ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली. मंगळवार उजाडला तरीही अनेक भागात अजूनही वीजपुरवठा सुरु करण्यात वीज खात्याला यश आलेलं नाही. त्रस्त झालेल्या गोवेकरांनी मिळेल त्या माध्यमाने वीज खात्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान एक गमतीदार संभाषण ट्विटरवर पाहायला मिळालं आहे. सध्या वीज खात्याच्या याच ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून नेटकऱ्यांनीही याला तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसादही दिला आहे. (Goa Electricity Department Twit on Power cuts)

सोमवारी रात्री 9 वाजल्यानंतर गोव्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातलं. अनेकठिकाणी झाडं कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मुख्य वाहिनींवर झाडं पडल्याने वीज अजूनही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य गोवेकरांनी मिळेल त्या मार्गाने वीज खात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गोवा वीज खातं ट्विटरवच चांगलंच अॅक्टिव्ह असतं. ट्विटरवर नेटकऱ्यांनी वीज कधीपर्यंत पूर्ववत होईल अशी खात्याकडे विचारणा केली. यावर वीज खात्याचं ट्विटर सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याने गमतीशीर रिप्लाय दिले आहेत. तुम्ही मला विचारणा करत असलात तरी माझ्याकडेही वीज गेलेली आहे. त्यामुळे मी कोणत्याही क्षणी गायब होऊ शकतो. वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत कदाचित मी दिसणार नाही, असं एक ट्विट वीज खात्याच्या अधिकृत अकाऊंटवरुन केलं गेलं.

मीही तुमच्यासारखाच माणूस आहे. वीज खात्याचा कर्मचारी असलो तरी मला खास वागणूक नाही. माझ्याघरीही वीज गायब आहे. त्यामुळे मी कोणत्याही क्षणी गायब होऊ शकतो. वीजपुरवठा सुरळीत होऊन मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज होईपर्यंत तुमच्यापासून दूर जाऊ शकतो असं एक ट्विट करण्यात आलं आहे. यावर एका ट्विटर वापरकर्त्याने हे कसं शक्य आहे असा प्रश्न केला. यावर दुसरं एक ट्विट करुन कर्मचाऱ्याने ट्विटर यूजरला उत्तर दिलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये मी वीज खात्याचा कर्मचारी असलो तरीही सध्या ऑफिसच्या बाहेर आहे. मी एकटाच ट्विटरवर अॅक्टिव्ह असलो तरीही मला कोणतीही विशेष सेवा मिळत नाही. मी सुद्धा मार्गाने जातो आणि अडचण आल्यास त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो, असं संबंधित कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. वीज गायब झाल्याने त्रस्त झालेल्या गोवेकरांचं या वीज कर्मचाऱ्याने काहीकाळ मनोरंजन केल्याचं दिसतंय. मात्र काहीवेळाने ही सर्व ट्विट डिलीट करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT