Goa AAP Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 'AAP' राजकारण तापवणार

गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीला सात महिने बाकी असतानाच राजकीय आखाड्यातील प्रत्यक्षातील खडाखडी सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीला (Election) सात महिने बाकी असतानाच राजकीय आखाड्यातील प्रत्यक्षातील खडाखडी सुरू झाली आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा यांचे कार्यकर्ते सलगपणे दोन दिवस भिडले. आता राजकीय वातावरण आणखीन घुसळून टाकण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज गोव्यात येत आहेत. (Goa Election Gomantakis now want change)

आमदार खरेदी विक्रीच्या घाणेरड्या राजकारणाचे प्रकार आता बस्स झाले. गोमंतकीयांना आता बदल हवा आहे असे म्हणत राज्यातील सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोध पक्ष असलेल्या कॉंग्रेसला ट्विटरवर केजरीवाल यांनी लक्ष्य केले आहे. गोव्यातील सरकारकडे निधी नाही असे नाही. जनतेला विकास हवा आहे. विकासावर निधी खर्च करण्याची सरकारकडे प्रामाणिक इच्छा नाही असे म्हणत त्यांनी सरळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर शरसंधान केले आहे. आपचे दिल्लीतील आमदार राघव चड्ढा, आतिषी मार्लेना आदींनी गोव्याचा दौरा केल्यानंतर आता खुद्द केजरीवाल गोव्यात येत आहेत.

‘‘आप’ला जशास तसे उत्तर देऊ’

लोकशाहीत दुसऱ्या पक्षाच्या धोरणांना विरोध करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण आमदारांच्या घरावर मोर्चा नेऊन राडा करण्याचा अधिकार कुणालाही नाही. जर आम आदमी पक्षाने असेच हातघाईचे राजकारण केल्यास त्यांना आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे प्रवक्ते दामू नाईक यांनी आज दिला. नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांच्या घरावर आपच्या उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी मोर्चा आणल्यावर जो हंगामा झाला, त्यावर सध्या गोव्यात उलटसुलट चर्चा चालू असताना आज भाजपने पलटवार केला.

प्रदेश समितीचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी ‘आप’च्या या मोर्चाचा निषेध करताना, आप गोव्यात घाणेरडी राजकीय संस्कृती आणू पाहात आहे. त्यांचे हे प्रकार आम्ही खपवून घेऊ या भ्रमात त्यांनी राहू नये, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असे सांगितले. काँग्रेसचे 10 आमदार भाजपात येणे ही त्यावेळची गरज होती. गोव्यात माजलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि गोवा विकायला निघालेल्या काही मंत्र्यांना वेसण घालण्यासाठी त्या आमदारांना भाजपात सामावून घेणे गरजेचे होते. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ते भाजपात आले होते, असे नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT