गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Shri Arvind Kejriwal) हे उद्या 13 जुलै रोजी गोव्यात दाखल होणार आहेत. आम आदमी पक्षाने 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी राजनीतीचे जाळे विणायला सुरुवात केली असून सत्ताधारी भाजप पक्षावर तसेच विरोधी बाकावर बसलेल्या कॉंग्रेस पक्षाला आम आदमी पक्ष धारेवर धरु लागले आहेत.
आपच्या नेत्यांनी आतापर्यंत गोव्यात विविध आंदोलने देखील केली, मग ते आंदोलन असो वा सत्तेत बसण्यासाठी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना केक भेट देणे असो. आम आदमी पक्षाने अशी अनेक गोमंतकीयांच्या हक्कासाठीची छोटी-मोठी आंदोलने करून जनतेच्या मनात आम आदमी पक्षा विषयी आपलेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे गोव्यातील आम आदमी पक्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यासाठी आपचे सर्वेसर्वा श्री. अरविंद केजरीवाल हे उद्या 13 जुलै रोजी गोव्यात दाखल होणार आहेत त्यांच्या भेटीमागे गोव्याच्या राजकीय वर्तुळात अनेक समीकरणे उलगडू शकतात, त्यामुळे त्यांचा गोव्यातील दौरा फार ठरेल असे दिसते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.