Goa Election: Digambar kamat in goa politics

 

Dainik Gomantak 

गोवा

दिगंबर कामत यांना पराभूत करणे हेच ध्‍येय...

मडगाव पालिकेचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांचे विधान..!

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने आणि मोरेन रिबेलो यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्याने कुडतरीतील काँग्रेसची उमेदवारी खुली झाली आहे. (Goa Election) या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे पुत्र शॅलोम सार्दिन यांनी या उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. ‘मी कुडतरीतून निवडणूक लढवावी अशी मतदारसंघातील लोकांची इच्छा आहे. त्यामुळे या उमेदवारीसाठी मी उत्सुक असून काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर प्रस्ताव ठेवणार आहे’ असे त्यांनी सांगितले.

खासदार (ML) सार्दिन यांनीही आपला पुत्र निवडणूक लढविण्यास उत्सुक असून त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठींकडे त्यासाठी आपण बोलणार असेही त्‍यांनी स्‍पष्‍टपणे सांगितले आहे. आमदार आलेक्‍स ‍रेजिनाल्ड (Alex Reginald) लॉरेन्स यांनी आमदारकी सोडून कुडतरीच्या लोकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. काँग्रेस (Congress) पक्ष सोडून त्यांना या पक्षावर निवडून दिलेल्या मतदारांचा विश्वासघात केला आहे. कुडतरीच्या लोकांना सार्दिन कुटुंबावर विश्वास आहे. त्यासाठीच त्यांच्या आग्रहावरून माझ्या पुत्राने निवडणूक लढविण्यास होकार दिला आहे, अशी पुष्‍टी सार्दिन यांनी जोडली आहे.

तुम्ही निवडणूक (Election) लढविण्यास उत्सुक आहात का, असे विचारले असता खासदार म्हणून माझी अजून अडीच वर्षे बाकी आहेत. आपण जी कामे हाती घेतली आहेत, ती मला पूर्ण करायची आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नाही असेही फ्रान्‍सिस सार्दिन (Francis Sardin) यांनी स्‍पष्‍ट केले.

उमेदवारीसाठी तिघे उत्‍सुक

कुडतरीत काँग्रेस उमेदवारीवर आणखी तिघांनी दावा सांगितला असून त्यात कुडतरी गटाध्यक्ष मिलाग्रीस फर्नांडिस, राशोलचे सरपंच जोसेफ वाझ आणि कामुर्लीचे सरपंच बी. फर्नांडिस यांचा समावेश आहे. शुक्रवारी मडगाव येथील काँग्रेस जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत त्‍यांनी आपले दावे पेश केले. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. कुडतरी काँग्रेसने बुधवार दि. 29 डिसेंबर रोजी कुडतरीत जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेत काँग्रेसची पुढील कृती ठरणार असून रेजिनाल्ड यांच्यावर हल्लाबोल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिगंबर कामत यांना पराभूत करणे हेच ध्‍येय : घनश्याम शिरोडकर

मडगाव पालिकेचे नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून विधानसभा निवडणुकीत ते या पक्षातर्फे मडगाव मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. विद्यमान आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना पराभूत करणे हाच आपला एकमेव उद्देश असल्‍याची दर्पोक्ती त्‍यांनी केली आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत दिगंबर कामत यांच्या पॅनलमध्ये सहभागी होऊन त्यांनी निवडणूक लढविली होती. यात त्यांच्या पॅनलला गोवा फॉरवर्डच्या सहयोगाने बहुमतही प्राप्त झाले होते. त्‍यावेळी शिरोडकर यांनी मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर दावा केला होता. मात्र हे पद गोवा फॉरर्वडला दिले गेल्याने शिरोडकर यांनी दिगंबर कामत यांच्‍यापासून फारकत घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT