'Vaccination' of Goa citizens

'Vaccination' of Goa citizens

Dainik Gomantak

नागरिकांचे 'लसीकरण' झाल्याने गोवा सरकार बिनधास्त?

मुख्‍यमंत्री सावंत यांच्यासह अनेकांचा ख्रिसमसच्‍या पार्टीत सहभाग
Published on

पणजी (Goa) : मास ब्रंच आणि ख्रिसमस धूम असे आजच्या दिवसाचे वर्णन करावे लागेल. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओमिक्रोनची चिंता कायम आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध लागू केले आहेत. मात्र गोव्‍यात पर्यटन हंगामाचा ‘पीक पिरेड’ असल्याने आणि राज्यातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाल्याने सरकार बिनधास्त आहे.

<div class="paragraphs"><p>'Vaccination' of Goa citizens</p></div>
मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांनी कशाला जायला हवे? मुख्यमंत्र्यांचा निर्देश

येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा हा मध्यरात्री साजरा होतो. त्यामुळे मध्यरात्रीच्या प्रार्थनांना (नाईट मास) अनन्यसाधारण महत्‍व आहे. रात्री जागरणामुळे बहुतांश ख्रिस्ती बांधव सकाळचा नास्ता (ब्रेकफास्ट) टाळून दुपारच्या जेवणाबरोबर ख्रिसमसचा आनंद घेतात. तीच ब्रंच पार्टी होय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेत्यांनी ही संधी साधली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी आल्‍तिनो येथील आर्च बिशप पॅलेसमध्ये जाऊन गोव्‍याचे आर्च बिशप फिलिप नेरी फेर्राव यांना ख्रिसमसच्‍या (Christmas) शुभेच्छा दिल्या. त्याबरोबरच वीजमंत्री नीलेश काब्राल, आमदार विल्‍फ्रेड डिसा, क्‍लाफास डायस यांच्‍या घरी भेट देत ख्रिसमसच्‍या पार्टीत सहभाग नोंदवला. शिवाय अनेक ख्रिश्चन मंत्री आणि आमदारांना दूरध्‍वनीवरून शुभेच्छा दिल्या. सकाळीच त्‍यांनी सोशल मीडियावर पोस्‍ट टाकत गोमंतकीयांना नाताळाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. दुसरीकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, तृणमूलचे नेते आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स(Reginald Lawrence), लुईझिन फालेरो (Luisin Falero), ‘आप’चे राहुल म्‍हांबरे यांनीही जनतेला शुभेच्‍छा दिल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com