मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांनी कशाला जायला हवे? मुख्यमंत्र्यांचा निर्देश

मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबवा, असे कठोर निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उप- जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Chief Minister's instructions

Chief Minister's instructions

Dainik Gomantak

पणजी : मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांना वेठीस धरण्याचे प्रकार थांबवा, असे कठोर निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उप- जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. साखळीतील एका कार्यक्रमानिमित्त कार्यालयीन कामे बाजूला ठेवून मामलेदारांनी मंत्र्यांच्या स्वागतासाठी हजेरी लावली. या प्रकारामुळे मुख्यमंत्री चांगलेच संतापले. हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. परंतु यासंदर्भातील व्हिडिओ काल शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली.

मुख्यमंत्री : लोकांची कामे करण्यावर भर देण्याचा सल्ला

<div class="paragraphs"><p>Chief Minister's instructions</p></div>
चिंता वाढली! पाच दिवसांत गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

फोंडा (Ponda) उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) कार्यालयाला मुख्यमंत्री सावंत (CM Pramod Sawant) यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी तेथील बरेच अधिकारी अनुपस्थित आढळले. मामलेदारही कार्यालयात हजर नव्हते. याविषयी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, मंत्र्यांच्या कार्यक्रमाला मामलेदारांना पाठवल्याचे सांगितले. त्यावेळी संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी ‘मंत्र्यांच्या स्वागतासाठी मामलेदारांनी कशाला जायला हवे?’ असा प्रश्‍न करून लोकांची कामे पूर्ण करण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

<div class="paragraphs"><p>Chief Minister's instructions</p></div>
'ख्रिसमस'च्या मुहूर्तावर डिचोलीकरांना मतदानाचा संदेश

अगदी मुख्यमंत्री जरी कार्यक्रमाला आले असले, तरी मामलेदारांना पाठवू नका, असे सांगायलाही ते मागे राहिले नाहीत. शनिवारी दिवसभर समाजमाध्यमांवर या प्रकाराची चर्चा सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com