Pernem constituency election race Dainik Gomantak
गोवा

Pernem: विधानसभेची तयारी, पेडणे मतदारसंघातून अनेकजण इच्छुक; आजगावकर, कोरगावकर, पार्सेकर यांच्यात चुरस

pernem assembly constituency election 2027: आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांतर्गत आणि अपक्ष इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पेडणे: आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांतर्गत आणि अपक्ष इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विशेषतः भाजपच्या उमेदवारीसाठीच अनेक दावेदार पुढे येत असल्याने या मतदारसंघात स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात आपली राजकीय पकड मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे, २०२२च्या निवडणुकीत पेडणेऐवजी मडगावमधून भाजपच्या तिकिटावर लढलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीही पुन्हा पेडणे मतदारसंघातून दावा केला आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदारांशी संपर्क वाढवून संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.

दरम्यान, राजन कोरगावकर हे भाजपच्या उमेदवारीसाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत. ‘मिशन फॉर लोकल’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मागील निवडणुकीनंतरही मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. त्यांच्यासोबत काही जुने भाजप कार्यकर्तेही सक्रियपणे काम करत असल्याचे चित्र आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंते उत्तम पार्सेकर यांनी ‘पेडणे उदरगत ट्रस्ट’ची स्थापना करून राजकीय मैदानात प्रवेशाची तयारी केली आहे. निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कोरगावकर आणि डॉ. उदय कुडाळकर यांनीही मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्या आहेत. निवृत्त अभियंते विलास तांबोसकर आणि पत्रकार कमलाकर हुम्रसकर हेही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT