

पणजी: राज्यातील सातपैकी चार धरणांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांपेक्षा खाली आहे. त्यात मान्सूनपूर्व पावसात सातत्य नसल्याने आणि मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने गोव्यासमोर पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘‘राज्यातील धरणांमध्ये १५ जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. मान्सूनपूर्व पाऊस २ जूनपर्यंत कोसळत राहिल्यास पाण्याचे संकट नसेल’’, असे वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले होते.
परंतु, सातपैकी चार धरणांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने नागरिकांमध्ये काहीअंशी चिंतेचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.