Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Donald Trump Cancels Iran Peace Agreement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेला अंतरिम शांतता करार अधिकृतरित्या संपुष्टात आणला.
Donald Trump Cancels Iran Peace Agreement
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Trump Number One Target Tehran Plot: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेला अंतरिम शांतता करार अधिकृतरित्या संपुष्टात आणला. इराणने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सागरी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी इराणला याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा दिला. यापुढे अमेरिकेकडून इराणसोबत कधीही कोणताही करार केला जाणार नाही किंवा चर्चाही होणार नाही, कारण त्यांच्याशी बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, अशी कठोर भूमिका ट्रम्प यांनी घेतली.

करार रद्द करण्यासोबतच ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला की, ते इराणच्या 'किल लिस्ट'मध्ये टॉपवर आहेत. इराणचे सरकार, लष्कर आणि जनता त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी टपली असून तेहरान त्यांच्या हत्येचा कट रचत आहे, परंतु आपण या धोक्याची पर्वा न करता आपले काम करत राहू, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

Donald Trump Cancels Iran Peace Agreement
Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

नाटो शिखर परिषदेसाठी तुर्कीच्या अंकारा येथे असलेल्या ट्रम्प यांनी इराणच्या हल्ल्याची बातमी मिळताच तातडीने एक उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत संरक्षण सचिव पीट हेगसेथ, मार्को रुबियो, स्कॉट बेसेंट आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे चेअरमन जनरल डैन कैन सामील झाले होते. याच बैठकीत ट्रम्प यांनी शांतता करार रद्द करण्याची घोषणा केली आणि इराणवर लष्करी हल्ल्याचे आदेश देत त्याच्या खात्मेची रणनीती आखली.

Donald Trump Cancels Iran Peace Agreement
Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणचे (Iran) नेते अत्यंत खालच्या पातळीचे असून ते गेली 47 वर्षे हेच करत आले आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वी वाद वाढवण्याऐवजी मिटवण्याचा प्रयत्न केला, पण इराण आपल्या हरकतींपासून मागे हटत नसल्याने आता त्यांच्या या हिंमतीला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. माध्यमांमध्ये अशीही चर्चा सुरु आहे की, स्वतःच्या हत्येच्या भीतीपोटीच ट्रम्प यांनी हा करार मोडीत काढून थेट हल्ला केला.

Donald Trump Cancels Iran Peace Agreement
Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारानंतर इराणच्या लष्कराने आणि सरकारनेही अंतिम युद्धाची तयारी सुरु केली. अमेरिकेच्या हल्ल्यांची माहिती मिळताच इराणचे अध्यक्ष पेजेशकियन हे इराकचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. त्यांनी अमेरिकेवर सामंजस्य कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्याचवेळी, इराणनेही आपले इरादे स्पष्ट करत म्हटले की, ट्रम्प यांनी युद्धविराम पाळला किंवा तोडला तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि इराण शांत बसणार नाही. या संपूर्ण घडामोडींमुळे मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com