Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: गोव्यात शेतकरी चिंताग्रस्त! अवकाळीच्या धुमाकूळनंतर मोसमी पावसाने दमवले; मशागतीची कामे खोळंबली

Goa Farming Season: पुढील एक-दोन दिवसांत दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही, तर यंदा शेतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

डिचोली: यंदा मान्सून वेळेपूर्वीच दमदारपणे सक्रिय होणार, अशी आशा वाढली असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने बळिराजा चिंतेत पडला आहे. पावसाअभावी तालुक्यातील खरीप शेतीची मशागत व अन्य कामे खोळंबून पडली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून तर कडकडीत ऊन पडत असून उन्हाळ्याचे दिवस असल्याचे जाणवत आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कधी एकदाचा दमदार पाऊस सक्रिय होतोय आणि नांगरणी आदी शेती मशागतीची कामे सुरु करायला मिळते, त्याची बळीराजाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. कधी एकदाचा दमदार पाऊस बरसायला सुरवात होते आणि शेतीची खोळंबलेली कामे हाती घ्यायला मिळते, त्याची शेतकऱ्यांना काळजी लागून राहिली आहे.

...तर शेतीची कामे लांबणीवर पडणार

पुढील एक-दोन दिवसांत दमदार पर्जन्यवृष्टी झाली नाही, तर यंदा शेतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तशी भीतीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. डिचोली हा कृषिप्रधान तालुका असून साळ, मेणकूरे, धुमासे, लाटंबार्से, बोर्डे, मये, पिळगावसह बहुतेक भागात खरीप शेती लागवड केली जाते. यंदा वायंगण शेतीपिक समाधानकारक आल्याने शेतकरी भलतेच उत्साही बनले होते. शेतकऱ्यांना खरीप शेती लागवडीची लगबग सुरु केली होती.

नांगरणी, तरव्याची पेरणी अडली

''अवकाळी'' पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर यंदा मोसमी पाऊस वेळेवर म्हणजे जून महिन्याच्या सुरवातीलाच सक्रिय होणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र ऐन ''मिर्गा''वेळीच पाऊस गायब झाला आहे. पावसाला सुरवात झाल्याने बळिराजा मोठ्या उमेदीने शेतीत उतरला होता. नांगरणी आदी मशागत करून शेतकरी तरव्याची पेरणीकडे वळणार होते, मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने ''ब्रेक'' घेतल्याने तरव्याची पेरणी सोडाच, नांगरणी आदी शेतीची सुरवातीची कामे अडकून पडली आहेत. काहींनी शेतजमीन नांगरली आहे. दमदार पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल आणि अस्वस्थ बनला असून, बळिराजा गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

एक हजार हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट

विभागीय कृषी कार्यालयाने यंदा डिचोली तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक शेतजमीन खरीप लागवडीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना भातबियाणे वितरित करण्यात आले आहेत. मात्र अद्याप अनुकूल पाऊस पडला नसल्याने शेतीची कामे लांबणीवर पडली आहेत. पुढील काही दिवसांत पूरक प्रमाणात पाऊस पडून शेतीकामांना गती मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT